दिल्ली NCR

…..” आला रे आला , गोविंदा आला , कर्जतमध्ये उपनगराध्यक्ष संतोषदादा पाटील – दहिहंडी थरार २०२६ “……

" उपनगराध्यक्ष संतोषदादा पाटील व परिवर्तन विकास आघाडी " आयोजित दहीहंडी उत्सव २०२६ !

कर्जतमध्ये लाखाच्या दहिहंडीचा मानकरी कोण ? 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

” भारतीय संस्कृती , एकात्मता , संघटन व बंधुता ” यांचे दर्शन घडविणारा उत्सव म्हणजे ” दहीहंडी ” . नेहमीच अश्या उत्सव व सणांना प्राधान्य देवून तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे ” उपनगराध्यक्ष संतोषदादा पाटील व परिवर्तन विकास आघाडी आयोजित दहीहंडी उत्सव २०२६ “…..यावर्षी देखील लाखाचे बक्षिस व मनोरंजनात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. 

         ” मित्रांनो थराला या….. नाहीतर धरायला या…….आपलं समजून गोविंदाला या ” असे आवाहन कर्जतकर नागरिकांना संतोष दादा पाटील मित्र मंडळ हे दरवर्षी करत असतात . ” उत्सव संस्कृतीचा सोहळा परंपरेचा ” असल्याने महाराष्ट्रात ” दहीहंडी ” उत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे . बाळ गोपाळ व तरुण वर्ग यासाठी तीन महिने सराव करून दहीहंडी फोडण्यासाठी ” चित्त थरारक मानवी मनोरे ” उभे करून ” हम भी कूछ कम नहीं ” , असे दाखवून बक्षिसांचे मानकरी ठरतात . महाराष्ट्राची हि ” उत्सवाची पर्वणी ” कर्जत मध्ये देखील सर्वाँना अनुभवास व पाहण्यास मिळावी , व सणांचे महत्व ” अबाधित ” राहून ” संस्कृतीचे ” जतन व्हावे , याचे पुरेपूर लक्ष आपल्या कर्जत नगरीत ” उपनगराध्यक्ष संतोष दादा पाटील ” यांच्या आयोजनाने होत असते. 

          परिवर्तन विकास आघाडीचे सर्वेसर्वा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख ” नितीन दादा सावंत ” व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” त्याचप्रमाणे नगराध्यक्ष ” सौ. पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे ” यांच्या प्रमुख उपस्थितीत यावर्षी देखील मानाची लाखों रुपयांची दहीहंडी उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे . चित्त थरारक मानवी मनोरे , त्यावर दहीहंडी फोडणारा बाळ गोपाळ , दहीहंडी फोडण्याचा रोमहर्षक थरार , नामचीन मान्यवरांची एन्ट्री , संगीत – सुरांचा ताल , अशी कर्जतमध्ये १ लाख रुपयांची ” दहीहंडी उत्सव ” शनिवार दि. ०५ सप्टेंबर २०२६ रोजी सायं. ७.०० वा. स्थळ :- रिलायन्स पेट्रोल पंप जवळ , कर्जत – मुरबाड रोड , कर्जत रॉयल गार्डन शेजारील मैदान, कर्जत, जि. रायगड येथे होणार आहे .

          यासाठी प्रथम पारितोषिक रु. १,००००१/- रोख बक्षीस व आकर्षक चषक असे असून दरवर्षी मुंबई , ठाणे जिल्हा , पनवेल , नवी मुंबई , उरण , खोपोली , कर्जत तर रायगड जिल्ह्यातून अनेक गोविन्दा पथक येथे येत असतात . या चित्त थरारक ” मानवी मनोरे ” रचून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांचा थरार ” याची देही – याची डोळा ” बघण्यासाठी बाळ गोपाळ , महिला वर्ग व कर्जत तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे , असे आवाहन ” उपनगराध्यक्ष संतोष दादा पाटील व मित्र मंडळाने ” केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!