…..” दुसऱ्यांच्या मतदार संघात खासदार सुनील तटकरे यांनी ढवळाढवळ करून श्रेय घेऊ नये – खासदार ” श्रीरंग आप्पा बारणे ” यांचा खोचक इशारा
" पालकमंत्री भरतशेठ गोगावले " यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती !

पालकमंत्री ” भरतशेठ गोगावले ” यांच्या नियुक्तीने शिवसैनिकांची ” दसरा – दिवाळी – होळी ” साजरी होत आहे – जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जतमध्ये महारेल ने उड्डाण पुलांचे प्रस्ताव सादर केले असून त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कॅबिनेटची सही झालेली नसल्याने नागरिकांत भ्रम पसरवून दुसऱ्यांच्या मतदार संघात ढवळाढवळ करून श्रेय घेऊ नये , अशी खोचक टिका मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर काल बुधवार दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी शिवतीर्थ येथे झालेल्या नवनिर्वाचित पालकमंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्या सत्कार सोहळ्यात केली.

याप्रसंगी व्यासपीठावर सत्कारमूर्ती रायगडचे नवनिर्वाचित पालकमंत्री मान. नामदार भरत शेठ गोगावले , माजी आमदार तथा शिवसेनेचे उपनेते शहाजी बापू पाटील , अलिबागचे आमदार महेंद्र दळवी , कर्जत मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे , जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , संघटक विजय पाटील , विधान सभा संघटक शिवराम बदे , खालापूर सभापती भाई शिंदे , कर्जत ता. प्रमुख सुदाम दादा पवाळी , संघटक संभाजी जगताप , मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे , जिल्हा युवा प्रमुख प्रसाद थोरवे , राजिप मा. अध्यक्ष सुरेश दादा टोकरे , मा. नगरसेवक बाळाजी विचारे , माथेरान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी , खोपोली नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे , माजी सभापती तथा युवा ता. प्रमुख अमर मिसाळ , विरोधी पक्ष नेते ॲड संकेत दादा भासे , शहर प्रमुख संजय मोहिते , शिवाजी खारीक , भास्कर दिसले , मा नगरसेवक मोहन औसरमल , संघटक अरुण देशमुख , आर पी आय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड , कोकण कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , शहर संघटक नदीम भाई खान , विभाग प्रमुख गणेश पालकर , सुनील ठाकूर , मा. पंचायत समिती सदस्य मीना थोरवे , भाजप जिल्हा नेते तानाजी चव्हाण , जिल्हा महासचिव दिपक बेहरे , मा. नगराध्यक्ष शरद भाऊ लाड , जिल्हा संघटक राजेश भगत , मा. उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , राजिप मा. समाज कल्याण सभापती सुभाष दादा गवळे , मा. सरपंच उत्तम सोनावणे , संघटक दिलीप ताम्हाणे , शिवाजी देशमुख , त्याचप्रमाणे कर्जत – खोपोली – माथेरान – खालापूर न. प. च्या सर्व नगरसेवक – नगरसेविका , शिवसैनिक , युवा सेना , महिला आघाडी मोठ्या संख्येने या अभुतपुर्व सोहळ्यास उपस्थित होते.
याप्रसंगी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी मी खासदार सुनील तटकरे यांच्या पेक्षा सिनियर खासदार असून त्यांना याबाबी माहित नसतील , असेही ते म्हणाले. जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर यांनी पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची नियुक्ती झाल्याने तमाम शिवसैनिकांची दसरा – दिवाळी – होली साजरी होत आहे , ज्यासाठी अट्टाहास केला , अश्या रायगडाच्या दोन्ही आमदारांनी विरोध न जुमानता तेवढ्याच ताकदीने प्रचंड साथ दिली , व हे पालकमंत्री पद खेचून आणले , असे गौरोदगार आमदार महेंद्र शेठ थोरवे व आमदार महेंद्र दळवी यांच्याबद्दल काढले.

यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना – युवा सेना – महिला आघाडी , शिवसैनिक तसेच भारतीय जनता पक्ष , आर पी आय , चे पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते. शिवतीर्थ सभागृह खचाखच भरला होता.




