दिल्ली NCR

…..” अखेर शिवसेनेचा ” ढाण्या वाघ ” जिंकला , रायगडच्या पालकमंत्री पदी भरत शेठ गोगावले यांची वर्णी “……

एक " डॅशिंग शिवसैनिक ते पालकमंत्री " संघर्षमय प्रवास , कर्जतमध्ये " शिवसैनिकांचा " जल्लोष !

आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांनी शिव मंदिरात फेडला नवस…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

गेली दिड वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले महाड पोलादपूर मतदार संघाचे आमदार व राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन तथा खारभूमी मंत्री मा.ना.श्री. भरतशेठ गोगावले यांची ” रायगडाच्या पालकमंत्री पदी ” निवड झाल्याने त्यांच्या या संघर्षात खांद्याला खांदा लावून साथ देणारे कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांनी कर्जतमध्ये जल्लोष साजरा करत शिवसैनिकांच्या साथीने आनंदोत्सव साजरा केला. त्यांच्या निवडीने , त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास अधिक गतिमान होईल, रायगडच्या नव्या विकासपर्वाची सुरुवात झाल्याचे मत यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी नवनिर्वाचित पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

         रायगडचा शिवसेनेचा हा ” ढाण्या वाघ , गोर गरिबांचा लोकनेता , भरत शेठ गोगावले ” महाड – पोलादपूर मतदार संघातून गेली चार दशके राजकारणात आहेत. महाड येथील ” बिरवाडी ” गाव येथून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. ग्रामपंचायत सरपंच , पंचायत समिती , जिल्हा परिषद सदस्य २ वेळा व , सभापती , चार वेळा आमदार , मंत्री व आता पालकमंत्री ,असा त्यांचा यशस्वी राजकीय प्रवास आहे. एक ” डॅशिंग शिवसैनिक ते पालकमंत्री ” हा त्यांचा प्रवास खूपच संघर्षमय आहे. शांत राहून तडका फडकी निर्णय घेणे , हा त्यांचा काम करण्याचा राजकीय स्वभाव असल्याने आलेल्या सर्वांनाच ते मदत करून आपलेसे करतात. आजपर्यंत त्यांनी हजारो करोडो रुपयांची विकास कामे करून आपल्या मतदार संघात ” विकासाची गंगा ” आणली आहे. अनेक तरुणांना रोजगार , धंदे दिल्याने ” तरुण शक्ती ” त्यांच्या पाठीशी ठाम आहे.

          .             

               शिवसेनेची रायगडात ३ आमदारांची ताकद असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अदिती तटकरे यांना पालकमंत्री पद यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते , मात्र याविरोधात आमदार भरत शेठ गोगावले , आमदार महेंद्र शेठ थोरवे व आमदार महेंद्र दळवी यांनी जोरदार विरोध केल्याने पक्ष नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या पालकमंत्री पदावर स्थगिती आणली होती. मात्र तब्बल दिड वर्षे संघर्ष करून अखेर हा ” रायगडचा ढाण्या वाघ ” जिंकला असून सोमवार दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी मंत्री भरत शेठ गोगावले यांची ” रायगडाच्या पालकमंत्री पदी ” निवड करण्यात आली.

         यानिमित्ताने आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांनी केलेला नवस फेडला असून पहिल्याच ” श्रावणी सोमवारी ” हि निवड झाल्याने शिव मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले , तर कर्जतमध्ये शिवसेनेचे संपर्क कार्यालय ” बाळासाहेब भवन ” येथे शिवसेना – युवा सेना – महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिकांनी जमून फटाक्यांची आतिषबाजी करून घोषणा देत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!