दिल्ली NCR

……” लोकसेवेचा वसा – तरुणांचे आधारस्तंभ – बहुजन समाजाचे कणखर नेतृत्व – योगेश आप्पा गायकवाड “……

दिशाहीन ” राजकारणाला ” दिशा देणारे , भीम गर्जना मित्र मंडळाचे सर्वेसर्वा……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत , कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज – फुले – शाहू – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महान विचारधारा बहुजन समाजात रुजवून समाजावर होणाऱ्या ” अन्याय अत्याचारा ” विरोधात नेहमीच अग्रेसर असणारे ” कर्जत तालुका भीम जयंती महोत्सवाचे पदाधिकारी व भीम गर्जना मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष योगेश आप्पा मारुती गायकवाड ” यांचे विचार नेहमीच बहुजन समाजासाठी ” प्रेरणादायी ” असून त्यांच्या माध्यमातून एक ” सक्षम नेतृत्व ” या कर्जत तालुक्यात , कर्जत बौद्ध नगर येथे पहाण्यास मिळत आहे . ” लोकसेवेचा ” वसा उचलून त्यांचे कार्य सर्वांच्याच मनात घर करून बसले आहे , म्हणूनच त्यांच्या कार्यात सतत सावली सारख्या असणाऱ्या त्यांची पत्नी ” सौ. सुमिता गायकवाड ” यांना जनतेने ” लोकप्रतिनिधी ” म्हणून कर्जत नगर परिषद निवडणुकीत बहुमताधिक्याने निवडून देऊन योगेश आप्पा यांच्या कार्याची पोच पावती दिली.

         आपल्या कार्यातून ते नेहमीच गोर गरीब , गरजू नागरिक , विद्यार्थी, व महिला भगिनींसाठी हिताचे व महत्वाचे उपक्रम राबविणे हे जणू कर्जत बौद्ध नगर येथे रहाणारे ” योगेश आप्पा गायकवाड ” यांचे जीवनाचे माध्यम झाले आहे . म्हणूनच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सतत हसतमुख , अतिशय नम्र स्वभावाचे ,सर्वांचा आदर ठेवणारे योगेश आप्पा गायकवाड सर्वांच्याच मनात घर करून आहेत . विद्यार्थ्यांना भविष्यात स्फूर्ती मिळावी , त्यांचे करिअर व्हावे , यासाठी मोफत क्लासेस घेतात . महिलांचे आर्थिक सबळीकरण व्हावे , यासाठी नेहमीच छोटे मोठे उद्योग धंदे करण्यास प्रोत्साहित करतात .

               वृक्षारोपण , रक्तदान शिबिर , आरोग्य शिबीर , महापुरुषांच्या व महा मातांच्या जयंती महोत्सव घेऊन देशव्यापी व बहुजन समाजात उल्लेखनीय कार्य करत तरुणांना उत्साहित करून राष्ट्र कार्य व देशाची उभारणी करण्यास हातभार लावतात . बहुजन समाजाला योग्य मार्ग दाखविणारे ” ज्येष्ठ विभुतींना सन्मानित ” करून त्यांना प्रोत्साहित करत असतात . पावसाळी छत्री वाटप करून अनेकांना छत देतात , कोरोना काळात देखील त्यांनी नागरिकांना अन्न – धान्य , कौटुंबिक वस्तू मदत देऊन खूप मोठे कार्य केले .

           डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा त्यांच्या कार्यात असल्याने ” लोकसेवा ” करत रहा , सामाजिक कार्याबरोबरच राजकारणात उतरून दिशाहीन राजकारणाला दिशा देण्याचे कार्य करा , असे प्रगल्भ विचार योगेश आप्पा गायकवाड नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगत असतात , मात्र त्याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेतून करा , तरुणांचे आधारस्तंभ व प्रभागात त्यांचे कार्य सर्वोत्कृष्ट असल्याने ते जनतेच्या मनातील जनसेवक आहेत.

         

              दिवंगत वडील ” मारुती गायकवाड ” यांची कृपा , आई ” नंदा ” यांचे आशीर्वाद , त्याचप्रमाणे नेहमीच सावली सारखी प्रत्येक कार्यात सहभागी असणारी पत्नी ” नगरसेविका सुमिता गायकवाड ” व भाऊ ” विकास ” यांची साथ , ” सह्याद्री ” या कन्येचा जिव्हाळा , तर कुटुंबातील सर्व सदस्यांच्या तसेच मित्र परिवाराच्या सहकार्यामुळेच माझ्या हातून ही ” समाजसेवा ” होत असून मी इथवर पोहचलो , असे ” जनसेवक ” , तरुण तडफदार नेतृत्व ” योगेश आप्पा मारुती गायकवाड ” हे सांगत असतात . 

          त्यांच्या प्रत्येक वाढदिवशी ” सामाजिक प्रेरणादायी ” कार्यक्रम होत असून यावर्षी देखील १५ ऑगस्ट २०२६ रोजी दरवर्षी समाजपयोगी कार्यक्रम होत असतात. ” १५ ऑगस्ट ” या देशाच्या स्वांतत्र्य दिनी त्यांचा जन्म झाला असल्याने अशा ” कर्तृत्ववान नेतृत्वास ” आशीर्वाद देण्यास उपस्थिती दर्शवावी , असे निमंत्रण योगेश आप्पा गायकवाड मित्र परिवाराने केले आहे . त्यांच्या जन्मदिनी त्यांना मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!