दिल्ली NCR

……” राज साहेबांचा कट्टर मावळा राजेश साळुंखे पुन्हा एकदा जनतेच्या सेवेला “…..

" महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या " कर्जत शहर प्रमुख पदी " राजेश साळुंखे " यांची फेर नियुक्ती !

जिल्हा प्रमुख ” बाळा शेठ म्हात्रे ” यांनी दाखविलेला विश्वास सार्थकी ठरवणार – राजेश साळुंखे…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापनेपासून ” राजसाहेब ठाकरे ” यांच्या प्रगल्भ विचारांवर प्रेम करणारा , गेली अनेक वर्षे कर्जत नगर परिषद हद्दीत ” मनसे ” ची पाळेमुळे सर्व विभागात घट्ट रोवून , नागरिकांच्या समस्या अडचणी सोडवून , पक्षाचे हित जपून प्रत्येक आंदोलनात हिरीरीने भाग घेणारा , तर कर्जत नगर परिषद निवडणुकीत आमराई – दहिवली प्रभाग क्रमांक ९ अ मधून निकराची झुंज देणारा राजसाहेबांचा कट्टर मावळा ” राजेश साळुंखे ” यांना पुन्हा एकदा मनसे कर्जत शहर प्रमुख पदाची धुरा मनसेचे जिल्हा प्रमुख ” बाळा शेठ म्हात्रे ” यांनी दिली आहे . त्यांच्या या फेर नियुक्तीमुळे मनसे सैनिकांत उत्साहाचे वातावरण असून त्यांचा सर्व क्षेत्रातून ” अभिनंदनाचा ” वर्षाव होत आहे .

           महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे सर्वेसर्वा तथा मराठी हृदय सम्राट ” राज साहेब ठाकरे ” यांचा कट्टर मनसे सैनिक म्हणून राजेश साळुंखे यांनी गेली १७ वर्षे कर्जत शहरात नागरिकांच्या हिताची कामे करून ” माय बाप जनतेला ” न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे . स्वाभिमानाची लढाई लढत, निकराची ” झुंज ” देत मनसे पक्ष वाढविण्यात कर्जत शहरात तनमन धन अर्पण करून मराठी अस्मिता जपण्याचा ” मनसे कर्जत शहर प्रमुख राजेश साळुंखे ” यांनी प्रखरतेने प्रयत्न करून मनसे पक्ष टिकवून ठेवला . आजपर्यंत पक्षाशी ” एकनिष्ठ ” रहात त्यांनी पक्षाचा प्रत्येक आदेश मानून कार्यरत राहिले आहेत . 

         ” कमी बोलणे , पण कार्यातून कृती ” दाखवत शासकीय कार्यालयात नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडत त्या समस्या सोडविल्या आहेत . राजसाहेबांचा हा ” मावळा” गेली अनेक वर्षे गोर गरीब जनतेच्या समस्या घेऊन शासकीय दरबारात रस्ते , वीज , पाणी , आरोग्य , कचरा , स्वच्छता , शौचालय , वाहतूक , बेकायदेशीर पार्किंग , मराठी पाट्या , वाढीव घरपट्टी – पाणीपट्टी , कर्जत पोलीस ठाण्यात नागरिकांच्या तक्रारी , तहसील कार्यालयाच्या नागरिकांच्या समस्या , आदी कामे करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले आहेत . कर्जत नगरीत झालेल्या ” बजबजपुरी ” यातून जनतेला बाहेर काढण्यासाठी नुसत ” आश्वासन ” नाही तर ” रोखठोक भूमिका ” घेऊन मायबाप जनतेच्या, समस्यांवर आवाज उठवणारा, ” राजेश पिराजी साळुंके ” जनतेच्या मनात आदराने घर करून मनसे सैनिकांना जिवाला जीव देणारा ” हक्काचा कार्यकर्ता ” ठरला आहे.  

          यापूर्वी देखील त्यांनी मनसे कर्जत शहर प्रमुख म्हणून काम केले असल्याने मनसे सैनिकांच्या आग्रहाखातर पक्ष संघटनेने , मनसे प्रमुख सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने , रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संदीप देशपांडे , योगेशजी परुळेकर , राजेश येरूनकर , यांच्या हस्ते , रायगड जिल्हा प्रमुख बाळाशेठ म्हात्रे , उपजिल्हा अध्यक्ष अभिजितदादा घरत यांच्या मार्गदर्शनाने त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले . कर्जत शहरात अधिक प्रखरतेने कार्य करून पक्ष नेतृत्वांचा विश्वास सार्थकी ठरवून पक्ष संघटना पुन्हा एकदा जोमाने वाढवेणं , असे मत पुन्हा एकदा फेर नियुक्ती झालेले ” मनसे कर्जत शहर प्रमुख राजेश साळुंखे ” यांनी व्यक्त केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!