दिल्ली NCR

…..” घटनेने दिलेला सर्वोच्च माझं मत – माझा अधिकार , मग २००२ ची मतदार यादी कश्याला “…..

मतदार नाव नोंदणी करण्यासाठी " मतदार राजांची " फरफट !

कर्जतमध्ये ” SIR ” फॉर्म नाव नोंदीसाठी अनेक समस्या , मतदारांत ” संतापाची ” लाट…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

SIR फॉर्म भरून मतदान यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अख्खे राज्य कामाला लागले असताना , हे नाव समाविष्ट करण्यासाठी मतदार राजाला अनंत अडचणी येत आहेत . शासनाचे योग्य नियोजन नसल्याने मतदार राज्यांची यामुळे ” फरफट ” होत आहे. यामुळे वेळ , मेहनत , पैसा वाया जात असून यामुळे कर्जत सारख्या आदिवासी , कामगार , गरीब , कष्टकरी बहुल भागात मतदारांमध्ये ऐन पावसात ” संतापाची लाट ” उसळली आहे .

         ” माझ मत – माझा अधिकार “, असा ” भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांनी ” भारतीय राज्य घटनेच्या ” माध्यमातून प्रत्येकाला अधिकार दिला आहे . मात्र या अधिकाराचे पूर्ण ” धिंडवडे ” या SIR फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेतून होत आहे . एव्हढी मोठी मोहीम राबविताना अत्यंत अल्प कालावधी दिला आहे . मतदार बाहेरगावी , परप्रांतात गेला असेल तर काय होणार ? त्याचा प्रचार – प्रसार प्रशासनाने सर्वांना समजेल असा केला नाही . २०२६ पर्यंत मतदार यादीत नाव असताना SIR या मोहिमेच्या माध्यमातून २००२ सालाची मतदार यादी का हाताळली जाते ? यामध्ये २४ वर्षांचा फरक का ठेवला आहे ? याचे कोडे सर्वांना पडले आहे . या २००२ सालच्या यादीत तुमच्या नावाबरोबरच तुमच्या आई वडिलांपैकी एकाचे नाव असणे गरजचे आहे ? हि अट ठेवणे काय गरजेचे आहे ? अनेक तरुण – तरुणी , विवाह होऊन गेलेल्या , व आलेल्या तरुणी , अनेक अशिक्षित मतदारांची नावे २००२ साल नंतर मतदार यादीत समावेश करण्यात आली आहेत , मात्र त्यांचे आई वडील हयात नाहीत , तर अनेकांची नावे २००२ च्या यादीत नाहीत , मग त्यांनी काय करायचे ? अनेक मतदार मुंबई किंवा इतर ठिकाणाहून कर्जतमध्ये स्थलांतर झाली आहेत , त्यांच्या आई बाबांचं नाव यादीत नसेल तर ते शोधण्यास ते कुठे जाणार ? काही मतदार तर परप्रांतीय आहेत , त्यांनी हा फॉर्म भरण्यासाठी कशी जुळवणी करायची ? पुन्हा नाव मतदार यादीत येण्यासाठी तहसील कार्यालयात फेऱ्या मारायच्या ? पुन्हा वेगवेगळी कागदपत्रे जुळवायची ? अशा एक ना अनेक अडचणी येत असल्याने मतदार भांबावून गेला आहे , व त्यामुळे मतदारांमध्ये संतापाचे वातावरण आहे .

           देशाचे – राज्याचे – जिल्हा – तालुका – शहर – ग्रामीण भागातील नागरिकांचे राजकीय भवितव्य व लोकशाही मधील प्रमुख ” स्तंभ ” चालविणारी हि मतदान प्रक्रिया राबविताना त्यासाठी नेमलेल्या BLO यांना ट्रेनिंग तरी देण्यात आली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे . SIR फॉर्म भरण्यासाठी BLO हे घरोघरी जाणार , असे आदेश असताना हि प्रक्रिया मात्र कुठे मंदिरात , कुठे शाळेत , कुठे समाज मंदिर , कुठे चर्च , तर कुठे दुकानाच्या पत्र्याच्या शेडमध्ये तर कुठे राजकीय व्यक्तीच्या दारात राबविण्यात येत असल्याने , हाच का मतदारांचा सर्वोच्च अधिकार ? अशामुळे ” मतदान हक्काची क्रूर चेष्टा ” चालविल्या सारखी परिस्थिती प्रशासनाने ” मतदार राजावर ” आणली आहे . म्हणूनच कर्जतमध्ये या गलथान प्रक्रियेबद्दल सर्वांच्याच मनात संताप खदखदत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!