…..” शिवसेनेची वज्रमूठ राज्याचे उप मुख्यमंत्री मान. एकनाथजी शिंदे साहेब यांची कर्जतमध्ये बाळासाहेब भवन येथे भेट “…….
मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा !

कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांनी केले मोठ्या उत्साहात स्वागत !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
शिवसेनेची ” वज्रमूठ “, शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उप मुख्यमंत्री ” मान. एकनाथजी शिंदे साहेब ” यांचे आज शिवसेनेचे संपर्क कार्यालय ” बाळासाहेब भवन ” येथे कर्जत नगरीत सदिच्छा भेट दिल्याने त्यांचे कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांनी जंगी स्वागत केले . यावेळी कर्जत खालापूर मतदार संघातील अनेक शिवसेनेचे पदाधिकारी , शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी सर्वांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.


यावेळी आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या सोबत त्यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी कर्जत-खालापूर मतदारसंघातील असंख्य शिवसैनिक, पदाधिकारी, नगरसेवक, नगराध्यक्ष, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने ” बाळासाहेब भवन “, कर्जत येथे उपस्थित होत्या.

यावेळी आमदार मा. श्री. महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचा शाल – पुष्पगुच्छ व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या सदिच्छा भेटीने मतदार संघात उत्स्फूर्त वातावरण तयार झाल्याचे चित्र दिसून आले .





