Uncategorized

…..” कर्जत एस टी डेपो येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी “…..

सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहात " घटनेच्या शिल्पकारास " केले अभिवादन !

गेली ” ३० वर्षांपासून येथे ” जयंतीचे केले जाते आयोजन……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

भारतीय घटनेचे शिल्पकार – भारतरत्न ” डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांची ” १३५ ” वी जयंती कर्जत एस टी आगारात सर्व कर्मचारी वर्गाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग आपल्या कुटुंबांसहित उपस्थित होते .

         विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेत कर्मचारी व कामगार वर्गांसाठी बहुमोल कार्य करून हजारो अधिकार दिले आहेत . अनेक समाज वर्गासाठी दिलेले हे अधिकार आजही अनंत काळापर्यंत टिकून असल्याने त्या माध्यमातून ” स्वातंत्र्य – समता – न्याय – बंधुता – अधिकार ” बहाल करून जणू काही कवच कुंडले दिली असल्याने या उद्धारकर्त्यास नतमस्तक होऊन अभिवादन करण्यासाठी सर्व एस टी आगारातील कर्मचारी व कामगार , चालक , वाहक वर्ग आपल्या कुटुंबांसहित उपस्थित होते . यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनमोल कार्याबद्दल अनेकांनी विचार व्यक्त केले .

             कर्जत एस टी डेपो येथे सर्व कामगार , एस टी चालक , वाहक गेली ३० वर्षांपासून येथे ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या जयंतीचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येते . यावेळी स.वा.नि. श्री महादेव पालवे , अशोक पालवे , दिपक देशमुख , कामगार नेते श्री हरिश्चंद्र छत्तिसकर , नागेश भरकले , विलास बागुल , अतुल सोनावणे , विश्वनाथ वाघ , चिंतु डगला , श्रीम.ज्योती इंगळे हे कर्मचारी व अनेक इतर कामगार वर्ग कार्यक्रम स्थळी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी सर्व ” महापुरुषांच्या ” प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . यावेळी सर्वांना स्नेह भोजनाची व्यवस्था केली होती .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!