Uncategorized

…..” कर्जतचे श्री ग्रामदेव धापया देवस्थान ” अक्षय्य तृतीया उत्सव ” १९ व २० एप्रिल रोजी होणार साजरा !

तरी भाविकांनी " दर्शनास - उत्सवास - पालखीस व कुस्त्या पाहण्यासाठी " मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन !

कर्जतमध्ये ” पैलवानांच्या कुस्त्यांच्या फडात ” उडणार धुरळा……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जतचे ” ग्रामदैवत श्री धापया महाराज देवस्थान उत्सव ” अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी दरवर्षी होत असतो , तर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातुन येणाऱ्या पैलवांनांमुळे ” कुस्त्यांचा सामना ” चितपट होताना बघण्यास ” कुस्ती शौकीन ” सकाळ पासूनच गर्दी करतात . यावर्षी रविवार दिनांक १९ एप्रिल रोजी ” अक्षय तृतीया उत्सव ” तर सोमवार दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी ” कुस्त्यांचे फड ” , ठिकाण – श्री थापया मैदान, कर्जत – रायगड येथे होणार आहेत . या दिवसांची कुस्ती पटू अनेक दिवसांपासून वाट बघत असतात . त्यामुळे धापया देवस्थानचे दर्शन व कुस्ती शौकिनांमध्ये आनंदाचे वातावरण असते . विशेष म्हणजे यात महिला कुस्ती पटू देखील हिरीरीने उतरून आपला खेळ दाखवतात.

         श्री धापया महाराज देवस्थानचा उत्सव दरवर्षी मोठया उत्साहात साजरा केला जातो . दरवर्षी पहाटे ५ वाजताच अक्षय्य तृतीया उत्सवा निमित्त सनईवादन होते , तर ६ वाजता लघुरुद्र करून श्री धापया महाराज देवस्थानची पूजा अर्चा करण्यात येते , सका. ८ वा. ” अक्षय वर्धावे ” यांचे शास्त्रीय गायन आणि भक्ति संगीत कार्यक्रम तर दिवसभर श्री धापया महाराजांचे देवस्थान परिसरात दर्शन घेण्यास भाविकांची रांग असते . कुणाचे ” नवस ” फेडण्याची रिघ तसेच येथे ” जत्रेचे ” स्वरूप असते . मिठाई , खेळणी दुकानवाले दिवसभर घेऊन बसतात . सायंकाळी ५ वाजता ” श्रीं ” ची पालखी व मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात येते . सायं ६ वा. प्रसिध्द बुवांचे ” चक्री भजन ” व रात्रौ १० वा. मराठी चित्रपट ” क्रांतिज्योती विद्यालय ” मंदिर परिसरात ठेवण्यात येणार आहे .

          तर दुसऱ्या दिवशी सोमवार दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून तसेच मुंबई , पुणे , सोलापूर , कोल्हापूर , नवी मुंबई , नाशिक , सांगली , सातारा , रायगड तसेच कर्जत – खालापूर तालुक्यातील छोटे – मोठे पैलवान सकाळपासूनच ८ ते १२ व संध्याकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत चालणाऱ्या कुस्तीसाठी हजेरी लावून कुस्ती जिंकून श्री धापया महाराज देवस्थानच्या आखाड्यातील ” लाल माती ” उधळून जयघोष करीत सलामी देणार आहेत . ” देवस्थान कमिटी ” अखेरच्या कुस्तीपर्यंत सर्वांना न्याय देत हा उत्सव आजपर्यंत चालू आहे . कुस्तीचा हा वारसा स्वर्गीय रमेश चंदन पाटील , हसन शेठ शेख , मामा शेलार , दत्ता शेठ देशमुख , हजारे यांनी चालू केलेला आजही कुस्ती शौकिनांना पाहण्यास मिळत आहे .

       यावर्षी शेवटची कुस्ती स्व. रमेशजी चंदन (पाटील) (कर्जत चे प्रथम नगराध्यक्ष) यांच्या स्मरणार्थ श्री प्रसाद रमेशजी चंदन (पाटील) यांजकडून रोख बक्षिस देण्यात येणार आहे. तरी भाविकांनी ” दर्शनास – उत्सवास – पालखीस व कुस्त्या पाहण्यासाठी ” मोठ्या संख्येने धापया मैदान , कर्जत जि . रायगड येथे उपस्थित रहावे , असे आवाहन व निमंत्रण धापया देवस्थान कमिटीच्या वतीने अध्यक्ष गणेश संजय शिंदे , उपाध्यक्ष – प्रकाश दामोदर आणेकर , खजिनदार – नगरसेवक महेंद्र बबन चंदन ( पाटील ) , सहखजिनदार – गौरव चंद्रकांत भानुसघरे , चिटणीस – मनोज चंद्रकांत वरसोलिकर , सहचिटणीस – सचिन एकनाथ दगडे , यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!