Uncategorized

…..” कर्जत मुस्लिम समाजातर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन “……

" भीम जयंती " निमित्त मा. उपनगराध्यक्ष " राहुलजी डाळींबकर " यांचा केला सन्मान !

कर्जत मुस्लिम मस्जिद ट्रस्ट चे अध्यक्ष ” सैदु भाई शेख ” सहित सर्व कमिटी उपस्थित……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

भारतीय घटनेच्या माध्यमातून या देशात रहाणाऱ्या सर्व धर्मियांना समता – स्वतंत्रता – बंधुता त्याचबरोबर सर्वाधिक अनमोल असे मतांचा अधिकार देऊन आपले जीवन परिपूर्ण करणारे विश्व रत्न – महामानव ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कर्जतमध्ये कर्जत मुस्लिम मस्जिद ट्रस्ट तर्फे व मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात कर्जत येथील ” घटनेच्या शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला ” मानवंदना ” देऊन पुष्पहार अर्पण करून ” अभिवादन ” करण्यात आले . 

          यावेळी ” कर्जत मुस्लिम मस्जिद ट्रस्ट चे ” अध्यक्ष सैदु भाई शेख , उप सेक्रेटरी सलीम भाई जळगावकर , जहुर भाई शेख , सोहेल मुल्ला तसेच मुस्लिम समाजाचे वरिष्ठ सदस्य निसार चाचा शेख , हमीद भाई खैराट , शेरखान पठाण आदी पदाधिकारी उपस्थित राहून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

           याप्रसंगी कर्जत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आयु. ” राहुलजी डाळिंबकर ” यांचे ” कर्जत मुस्लिम ट्रस्ट व मुस्लिम समाजाच्या ” वतीने स्वागत करण्यात आले , व त्यांचे शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी बिलाल भाई आढाळ , इरफान भाई खलिफा , नदीम भाई खान , शोएब आढाळ , बंटी व इतर मान्यवर उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!