Uncategorized

…..” कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे व नगरसेवकांनी केले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन “……

कर्जत शहरात सर्वच प्रभागात दिल्या भेटी !

कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी ” तानाजी चव्हाण ” यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षा ” सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे , उप नगराध्यक्ष संतोष दादा पाटील व सर्व नगरसेवक – नगरसेविका तसेच मुख्याधिकारी तानाजी चव्हाण ” यांनी पालिकेच्या माध्यमातून ” भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून कर्जत शहरातील अर्धाकृती स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .

          कर्जत शहरात मोठ्या उत्साहात व आनंदात दरवर्षी ” महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांची जयंती साजरी होते . यानिमित्ताने कर्जत नगरीच्या प्रथम नागरिक या नात्याने ” नगराध्यक्षा सौ पुष्पाताई दगडे ” यांनी सर्व प्रभागात ठिकठिकाणी भेट देऊन ” विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या प्रतिमेस व त्यांच्या थोर विचारांना अभिवादन केले .

          यावेळी त्यांनी कर्जत बुद्ध नगर येथे ” योगेश आप्पा गायकवाड व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सौ. सुमिता योगेश आप्पा गायकवाड ” यांच्या सहकार्याने ” भीम गर्जना मित्र मंडळाने ” बौद्ध विहारात आयोजित केलेल्या जयंती निमित्त भेट दिली व अभिवादन केले . तसेच नाना मास्तर नगर – मुद्रे येथे स्मारकास अभिवादन केले , जुने एस टी स्टँड गुंडगे रोड येथे ही उपस्थित राहून अभिवादन केले . गुंडगे व पंचशील नगर येथे देखील उपस्थित राहून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन केले .

           याप्रसंगी कर्जत शहरात ज्युस वाटप व ” भारतीय संविधानाच्या प्रतिमेचे ” वाटप नागरिकांना व महिला वर्गाला करण्यात आले . यावेळी त्यांच्या समवेत मुख्याधिकारी तानाजी चव्हाण , सर्व नगरसेवक व नगरसेविका , पालिकेचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!