Uncategorized

…..” कर्जत तालुक्यात कडाव वडवली गावात भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी “…..

अनेक मान्यवरांनी भेट देऊन " घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर " यांना केले अभिवादन !

” सम्राट मित्र मंडळाने ” संपूर्ण गावात ” ओन्ली वन महामानव ” लावलेले बॅनर वरून दिला ” एकतेचा ” संदेश ……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यातील कडाव येथील वडवली गावात ” सम्राट मित्र मंडळ – वडवली ” च्या माध्यमातून प्रथमच भारतीय घटनेचे शिल्पकार ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली . यानिमित्ताने तालुक्यातील अनेक मान्यवरांनी या जयंती महोत्सवास भेट देऊन ” महामानवास ” पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .

            यावेळी संपूर्ण वडवली गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ” जीवनावर ” व त्यांनी केलेल्या ” अनमोल कार्याचे ” तसेच ” संघर्षाची ” पूर्ण माहिती बॅनर च्या माध्यमातून जनते समोर ठेवण्यात आली . तर एक वैशिष्ठ म्हणजे कुठल्याच बॅनर वर जयंती उत्सव कमिटी व पदाधिकारी – कार्यकर्त्यांचे फोटो टाकले नसल्याने ह्यां माध्यमातून गावाचे ” एकता व एकजुटीचे ” दर्शन घडले . ” ओन्ली वन महामानव ” असा संकल्प संपूर्ण कर्जत तालुक्यात देखील राबविण्यात यावा , असा संदेश या बॅनर च्या माध्यमातून सम्राट मित्र मंडळ – वडवली ने देण्यात आला .

           याप्रसंगी ” सम्राट मित्र मंडळ ” चे सर्व पदाधिकारी महिला वर्ग , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्वांनीच आनंदोत्सव साजरा केला . यावेळी बाबू शेट घारे ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) राजिप गट नेता , भगवान बोराडे (उद्योजक) , दिलीप कोळंबे , अशोक जाधव मुरुड – (उद्योजक) , सुदेश खांबे (खोपोली) , बाळाराम शिंदे (खोपोली) , प्रशांत जाधव ( पोसरी ) , नीलेश मार्के , देवा मिणमिणे , मंगेश भाऊ या मान्यवरांनी या जयंती महोत्सवास भेट देऊन ” विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या प्रतिमेस अभिवादन केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!