Uncategorized

…..” भीम राया मुळे आम्हा बुद्ध मिळाले – उत्कृष्ट देखाव्याने योगेश आप्पांनी सर्वांचीच मने जिंकली “…….

" भीम गर्जना मित्र मंडळाच्या " मिरवणुकीतील " शांती आणि क्रांतीच्या " देखाव्याने कर्जत मध्ये चर्चेला उधाण !

” योगेश आप्पा गायकवाड ” नाद नाही तुमचा , नियोजनबद्ध ” भीम जयंतीत ” भव्य शक्ती प्रदर्शन…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जतमध्ये ” डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या जयंती निमित्त ” योगेश आप्पा गायकवाड ” नाद नाही तुमचा , असा सूर कर्जत तालुक्यात उठला असून अत्यंत नियोजनबद्ध आयोजन व ” निळे वादळ ” उठवून संपूर्ण कर्जत शहरात केलेल्या सर्व नगरसेवकांच्या स्वागत कमानी बॅनरबाजीने चर्चेत असलेल्या ” योगेश आप्पांनी ” भीम गर्जना मित्र मंडळाची विश्व रत्न ” डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांची १३५ वी जयंती कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागाच्या टोकापर्यंत पोहचवली , आणि सर्वांनीच स्तुती सुमने उधळली . भीम गर्जना मित्र मंडळाचे सर्वेसर्वा , सामाजिक कार्यकर्ते योगेश आप्पा गायकवाड यांच्या सुनियोजितपणे केलेल्या जयंतीच्या मिरवणुकीने , सर्वांनीच त्यांच्या या कार्याचे कौतुक केले .

       

 कर्जतमध्ये दरवर्षी १५ एप्रिल ची भव्य मिरवणूक योगेश आप्पा गायकवाड यांच्या भव्य देखाव्याने व नियोजनामुळे सर्वांच्याच लक्षात रहाते . यावर्षी विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची खुर्चीत बसलेली व भारतीय संविधान हातात घेतलेली मूर्ती तर पाठीमागे जवळ जवळ १० फूट उंच पद्मासन घालून डोळे मिटून ध्यानस्थ बसलेले शांत – निरागस – तेजोमय असे पांढरी शुभ्र तथागत भगवान गौतम बुद्ध यांची गोलाकार फिरणारी प्रतिमा व त्यावर ज्ञानाने परिपूर्ण झालेले सफेद वृक्ष ! खरोखरच हे ” दृश्य ” हा डोळ्यांचे पारणे फेडणारा देखावा , बघणाऱ्यांचे मन आनंदित करून सोडत होते .

        त्यातच डिजिटल बॅनर वर डी जे चा सुमधुर आवाज व सर्वांनाच थिरकायला लावणारे संगीत , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी , ढोल ताशांचा ” तररर ” आवाज , महापुरुषांच्या घोषणाबाजी , फटाक्यांची आतिषबाजीने , सप्तरंती दिव्यांच्या झोतात विश्वरत्न ” डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या जयंतीत व मिरवणुकीत ” निळ्या शक्तीचे ” अलोट दर्शन घडविणारे व ” निळे वादळ ” उठविणारी ही भव्य मिरवणूक व अग्रस्थानी उभे , तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले ” डॅशिंग नेतृत्व ” , कर्जत बौद्ध नगर येथील ” भीम गर्जना मित्र मंडळाचे ” संस्थापक आधारस्तंभ तथा सामाजिक कार्यकर्ते ” योगेश आप्पा गायकवाड ” यांच्या नियोजनबद्ध आयोजनाची झलक दिसत होती .

 

            यावेळी बुधवार दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजता ” कर्जत बुद्धनगर ते डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक अशी कर्जत बाजार पेठेतून निघालेल्या या भव्य मिरवणुकीस ” भीम गर्जना मित्र मंडळाचे ” सर्वेसर्वा योगेश आप्पा गायकवाड व नव निर्वाचित नगरसेविका ” सौ. सुमिता योगेश आप्पा गायकवाड ” यांचे नेतृत्वाखाली भीम गर्जना मित्र मंडळाचे पदाधिकारी , कार्यकर्ते , कर्जत बौद्ध नगर मधील तमाम बौद्ध बांधव व महिला भगिनी , बहुजन वर्ग , तरुण तरुणी , मित्र परिवार , आप्तेष्ट , तमाम कर्जतकर , बच्चे कंपनी सामील झाले होते . त्यामुळे यावर्षी देखील भीम गर्जना मित्र मंडळाची भीम जयंती सर्वार्थाने गाजली , ” योगेश आप्पा – नाद नाही तुमचा ” , असे मत सर्व बहुजन वर्ग व्यक्त करत होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!