Uncategorized

कर्जतमध्ये क्रांतिसूर्य ” डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी !

सर्वांनी कर्जत येथील " महामानवाच्या " स्मारकास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन !

ठिकठिकाणी ” मिरवणूक ” काढून केला भीम जयंतीचा जल्लोष…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत शहरात विश्वरत्न – क्रांतिसूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मंगळवारी ” १४ एप्रिल २०२६ ” रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी अनेक मान्यवरांनी तसेच बहुजन वर्ग व आंबेडकरी अनुयायांनी आपले ” उध्दारकर्ते व घटनेच्या माध्यमातून हजारो अधिकार बहाल करणारे घटनाकार ” यांना तमाम माता – भगिनी – नागरिकांनी ” भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक कर्जत ” येथे उपस्थिती दर्शवून त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .

            यावेळी राजकीय – सामाजिक – शैक्षणिक – धार्मिक – सांस्कृतिक – कला – क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले . यावेळी गुंडगे , पंचशील नगर , संत श्री रोहिदास नगर , जुने एस टी स्टँड परिसर , विजय मित्र मंडळ , रेल्वे घाट बंगला , भिसेगाव , मुद्रे , नाना मास्तर नगर , दहिवली , आकुर्ले , कर्जत शहर , आदी परिसरातील बहुजन वर्ग , बौद्ध समाज , महिला , तरुण – तरुणी , बच्चे कंपनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात , डी जे च्या तालावर तरुणाई नाचत , निळे झेंडे फिरवत कर्जत शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

            यावेळी गेली अनेक वर्षांपासून ” विजय मित्र मंडळ ” घाटबंगलाचे अध्यक्ष राहुल सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली व मिलिंद भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.जे. सिस्टिमची व्यवस्था करून भव्य मिरवणुकीत सर्व गुंडगे वासिय महिला वर्ग व तरुणाई सामील होतात . यावेळी राहुल सूर्यवंशी या सामाजिक कार्यकर्ते व परिवाराने सर्व बौद्ध बांधव व महिला भगिनीस मोफत ऊसाच्या ताज्या रसाचे वाटप केले , तर मानव बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या अध्यक्षा सौ. सविता जगताप , कांचन रविंद्र धारगावे , ईश्वर भालेराव यांनी मोफत थंड ताक , पाणी व समोसा , लाडूचे वाटप केले , तसेच कर्जत नगर परिषदेच्या वतीने थंड ज्यूस वाटण्यात आले , सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पवार यांनी थंड पेया च्या बाटल्या वाटल्या , मुस्लिम समाज बांधवांनी देखील थंड ज्यूस वाटले . जुने एस टी स्टँड येथे जयंतीचे अध्यक्ष सुनील बाबा चव्हाण यांनी कांदे पोहे व कलिंगड ज्यूस सर्वांना दिला .

         या मिरवणुकीत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव , शहराध्यक्ष सुभाष सोनावणे , संघटक तुषार बनसोडे , उपाध्यक्ष चंद्रकांत धनवटे , अनिल जाधव , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा. नगरसेवक उमेश गायकवाड , त्याचप्रमाणे आरपीआय चे शहर अध्यक्ष अरविंद मोरे , महिला शहर अध्यक्षा वैशाली भोसले , रेल्वे इलेक्टिकल इंजिनिअर महेश भोसले , मा. नगरसेवक दिपक मोरे , वैशाली मोरे , आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन भालेराव , भीम गर्जना मित्र मंडळ कर्जत बौद्ध नगर चे अध्यक्ष योगेश आप्पा गायकवाड , बी एस पी चे शहराध्यक्ष सचिन चव्हाण , मंगेश गायकवाड , तानाजी सोनावणे , तसेच भारतीय बौद्ध महासभेचे व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

     

          यावेळी संध्याकाळी कर्जत बौद्ध नगर येथील राहुल युवक मंडळचे आधारस्तंभ व जयंतीचे अध्यक्ष मा. उप नगराध्यक्ष राहुल डाळींबकर यांच्या नेतृत्वाखाली सतिश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळाचे अध्यक्ष सिद्धांत डाळींबकर सहित सर्व रहिवासी , नागरिकांनी डी जे च्या तालावर , ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक बाजारपेठेतून निघाली , तसेच गुंडगे प्रभागात देखील भव्य मिरवणूक काढण्यात आली , यांत सर्वांचा उत्साह जोरदार होता तर महिला व तरुणाईची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून आली . सर्वांनी एकत्रित जमून भीम जयंतीचा आनंदोत्सव साजरा केला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!