Uncategorized

……” पुरातत्व विभागाने बसविले कर्जत तालुक्यात आंबिवली बुद्ध लेणी येथे QR कोड “……

पर्यटकांना मिळणार आत्ता " ऑडियो गाइड " द्वारे लेणी ची संपूर्ण माहिती !

कर्जत चे लेणी संवर्धक ” जीतरत्न जाधव – विकास धनवे – नरेश जाधव ” यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यात पुरातत्व विभागाने ” आंबिवली बुद्ध लेणी ” येथे ” QR कोड ” बसविले असून यामाध्यमातून आता येथे येणाऱ्या पर्यटकांना ” ऑडियो गाइड ” द्वारे लेणी ची संपूर्ण माहिती मिळणार असून याचे श्रेय कर्जत नगर परिषद हद्दीतील पंचशील नगर येथे रहाणारे ” लेणी संवर्धक जीतरत्न जाधव – विकास धनवे – नरेश जाधव ” यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे .

          लेणी संवर्धक ” जीतरत्न जाधव – विकास धनवे – नरेश जाधव ” हे कर्जत मधील लेण्यांचे संवर्धक म्हणून काम करत असतात . त्यांनी पुरातत्व विभागाला QR कोड बसविण्याची मागणी केली होती , ज्याच्या माध्यमातून लेणी वर येणाऱ्या राज्यातून – देशातील पर्यटकांना लेणी ची संपूर्ण माहिती ऑडियो गाइड च्या माध्यमातून मिळणार आहे .

           शुक्रवार दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी आंबिवली बुद्ध लेणी येथे पुरातत्व विभागा मार्फत लेणी वर QR कोड द्वारा ऑडियो गाइड चे उद्घाटन करण्यात आले. सदर QR कोड मोबाईल मध्ये स्कैन केल्यास आपल्याला आंबिवली बुद्ध लेणी ची संपूर्ण माहिती इंग्रजी – हिंदी आणि मराठी मध्ये उपलब्ध होणार आहे .

          सदर कार्यक्रमाला पुरातत्व विभागाचे रीजनल डायरेक्टर , सुपरिडेंटंट , सब सर्कल हेड आणि इतर सर्व अधिकारी उपस्थित होते , तसेच कर्जत मधून जीतरत्न जाधव , श्वेता जाधव , नरेश जाधव आणि स्नेहा जाधव हे लेणी संवर्धक उपस्थित होते.

           कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व त्या नंतर सदर QR कोड चे उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी ऑडियो गाइड बद्दल माहिती दिली व त्याचा उपयोग सांगितला. शेवटी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वांचे आभार मानले यासोबतच लेणी संवर्धन जीतरत्न जाधव यांनी सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले व असेच सहकार्य राहू द्या , अशी अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!