Uncategorized

……” कर्जत मध्ये भारत गॅस सिलेंडर एजन्सीचा पुन्हा एकदा कारभार चव्हाट्यावर “…..

सकाळी ६ वाजल्या पासून शेकडो ग्राहक रांगेत , बुकिंग होऊनही " सिलेंडर " नाहीत , ग्राहक संतप्त !

बेभरोवशी ” भारत गॅस सिलेंडर एजन्सी ” बंद करा , आर पी आय युवा कर्जत तालुका अध्यक्ष ” जगदीश भाई शिंदे ” यांचा इशारा…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

सिलेंडर गॅस विना कुटुंबाच्या ” पोटाची खळगी ” कशी भरायची ? ” जेवण ” कसे बनवणार ? असा संतप्त सवाल आर पी आय कर्जत तालुका युवा अध्यक्ष ” जगदीश भाई शिंदे ” यांनी करत कर्जत मधील ” भारत गॅस सिलेंडर एजन्सी ” जर तासनतास उपाशी पोटी , सकाळी ६ वाजल्यापासून लहान मुलाना घेऊन उन्हात उभे राहून ग्राहकांना जर सिलेंडर देत नसतील तर हि भारत गॅस सिलेंडर एजन्सी चे दुकान ” बंद ” करा , अशी संतप्त मागणी आर पी आय आठवले गटाचे युवा कर्जत तालुका अध्यक्ष जगदीश भाई शिंदे यांनी केली आहे . ग्राहकांची हि अशी अवस्था होत असेल तर कर्जत तहसीलदार धनंजय जाधव यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे .

           उद्या रविवार सुट्टीचा दिवस असल्याने आज शनिवार दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून कर्जत मधील आमराई परिसरात असलेल्या भारत गॅस सिलेंडर एजन्सी समोर कर्जत तालुक्यातील कर्जत शहरापासून खांडस – कडाव व इतर भागातील अनेक महिला , व ग्राहक इथे सिलेंडर मिळण्यासाठी रांगेत उभे होते . इथे कुठलीही निवाऱ्याची , पाण्याची सोय नसल्याने सर्वांचाच जीव भर उन्हात कासावीस झाला होता . ऐन ४ वाजता गाडी आली नाही तर सिलेंडर कुठून देणार ? असे बेजबाबदारपणाचे येथील महिला कर्मचारी यांनी सांगितल्यावर सर्वांचाच संताप अनावर झाला .

          यावेळी गॅस सिलेंडर साठी तिथे उपस्थित असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )पक्षाचे युवा कर्जत तालुका अध्यक्ष ” जगदीश भाई शिंदे ” यांनी या गंभीर प्रश्नावर आवाज उठवत याचा ” जाब ” भारत गॅस सिलेंडर एजन्सी कर्मचारी यांना विचारून ओ टी पी येवून ग्राहकांची सिलेंडर ची बुकिंग होऊन सिलेंडर मिळत नसेल तर भारत गॅस सिलेंडर एजन्सी बंद करा , अशी संतप्त मागणी त्यांनी केली असून याविरोधात ” तीव्र आंदोलन ” छेडण्याचा इशारा दिला आहे .

          हा सर्व भारत गॅस सिलेंडर एजन्सी चा ” बेभरोवसा कारभार ” आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांना सांगितला असून , याविरोधात कर्जत तहसील कार्यालयात तहसीलदार ” धनंजय जाधव ” यांना संतप्त निवेदन देणार असून ग्राहकांना सिलेंडरची सेवा न मिळाल्यास ” तीव्र आंदोलन ” छेडण्यात येईल , असा संतप्त इशारा आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष जगदीश भाई शिंदे यांनी याप्रसंगी दिला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!