दिल्ली NCR

…….” कर्जत तालुक्यातील हे सर्व प्रकल्प व धरणे डाटा सेंटरसाठी होत आहेत , सरकारने आपली भुमिका उघड करावी – वंचितचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर कडाडले “……

टोरेंट प्रकल्पा विरोधातील कर्जतकरांच्या लढ्याला दिला पाठिंबा !

खबरदार , विकासाच्या नावाखाली ” जंगलाचा विनाश आणि आदिवासींच्या अस्तित्वावर ” घाला घालाल तर……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

सह्याद्रीचे जंगल, पर्यावरण, आदिवासींचे हक्क आणि स्थानिक जनतेच्या अस्तित्वाच्या प्रश्नावरून कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या टोरेंट पंप्ड स्टोरेज प्रकल्पा विरोधातील आंदोलनाला आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला. पाली येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश होता कामा नये, अशी ठाम भूमिका मांडली. वीज निर्मिती आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखणे आवश्यक असून, स्थानिक जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही प्रकल्प पुढे नेणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

       टोरेंटच्या साईडोंगर-१ आणि साईडोंगर-२ पंप्ड स्टोरेज प्रकल्पांमुळे सह्याद्रीच्या जंगलावर, जलस्रोतांवर, जैव विविधतेवर आणि आदिवासींच्या पारंपरिक जीवन पद्धतीवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. विकासाच्या नावाखाली जंगलाचा विनाश आणि आदिवासींच्या अस्तित्वावर घाला घालणे आम्हाला मान्य नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

          आदिवासींचे वनहक्क, ग्रामसभांचे अधिकार, पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास आणि प्रकल्पासंबंधी सर्व परवानग्यांमधील पारदर्शकता , याबाबत सरकारने जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही करण्यात आली.सरकारने लुपाछपी करु नये. यावेळी सरकारला प्रश्न विचारताना प्रकल्पाचे एकत्रित पर्यावरणीय परिणाम, पाण्याची उपलब्धता, वनजमिनीचे वळवणे आणि स्थानिक नागरिकांचे पुनर्वसन या मुद्द्यांवर सविस्तर माहिती सार्वजनिक करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

         ” जंगल ही कोणत्याही कंपनीची मालमत्ता नसून ती पुढच्या पिढ्यांची ठेव आहे “. आज आपण जंगल वाचवले तर उद्या जंगल आपल्याला वाचवेल,” असा संदेश देत त्यांनी कर्जतच्या जनतेला एकजुटीने आणि संविधानिक मार्गाने संघर्ष करण्याचे आवाहन केले.

          या सभेमुळे टोरेंट प्रकल्पा विरोधातील स्थानिक आंदोलनाला व्यापक राजकीय आणि सामाजिक पाठबळ मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कर्जत तालुका पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती आणि कर्जतकरांच्या वतीने सह्याद्री, जंगल, पाणी आणि आदिवासींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सुरू असलेला लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. 

         याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य दिपकदादा मोरे, जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, सरचिटणीस धर्मेंद्र मोरे, संघटक सुनिल आप्पा गायकवाड, तालूका अध्यक्ष प्रदीप ढोले, उषाताई कांबळे, अनंता गायकवाड, प्रकाश गायकवाड, उल्हास जाधव, सचिन सरोते, लोकेश यादव सहित वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!