टॉप न्यूज़

…..” कर्जत नगर परिषदेतील सत्ताधारी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी फक्त ” कठपुतळी ” तर ” रिमोट कंट्रोल ” दुसऱ्याच्याच हाती “…….

" परिवर्तन विकास आघाडीचे " नेते कर्जत शहराच्या विकासाला ठरतायत अडसर !

” कंट्रोलहीन कारभाराचा ” नगरसेवक ” ॲड संकेत दादा भासे ” यांनी केला पत्रकार परिषदेत पर्दाफाश…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगर परिषदेत ” परिवर्तन विकास आघाडीची ” सत्ता येऊन एक वर्षाचा कालावधी व्हायला आला , तरी अद्यापि विकास कामांची तर नागरिकांच्या समस्या दूर होत नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असताना प्रत्येक प्रभागात संताप दिसत आहे. याविरोधात विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना – भाजपा नगरसेवकांनी अनेक वेळा मुख्याधिकारी तानाजी चव्हाण व नगराध्यक्षा सौ पुष्पाताई दगडे यांची भेट घेऊन नागरी सुविधा व नागरिकांच्या समस्या दूर करण्याची मागणी करूनही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याची ओरड होत असतानाच काल ०१ नोव्हेंबर २०२६ रोजी सत्ताधारी परिवर्तन विकास आघाडीने केलेल्या १४ कोटी १० लाख रु. विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजनाची अनेक कामे फक्त कागदावरच असून त्यांची वर्क ऑर्डर देखील निघालेल्या नसून व या यादीतील बहुतांश कामे हि आमदार निधीतून झाली असून नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याचे आरोप केले.

         विरोधी पक्षांच्या नगरसेवकांच्या प्रभागातील अनेक ७ कोटी २८ लाख रुपयांची कामांची वर्क ऑर्डर ” नगराध्यक्षा ” यांनी सही न करता रोखून ठेवली आहेत , तर अनेक बिले प्रलंबित पडली असल्याने याविरोधात गटनेते तथा विरोधी पक्षनेते ” ॲड संकेत दादा भासे ” यांनी याविरोधात प्रचंड संताप व्यक्त करत पत्रकार परिषद घेऊन यामागे कर्जत नगर परिषदेतील सत्ताधारी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी फक्त ” कठपुतळी ” असून ” रिमोट कंट्रोल ” मात्र दुसऱ्याच्याच हाती असल्याचा आरोप करून ” परिवर्तन विकास आघाडीचे ” नेते कर्जत शहराच्या विकासाला अडसर ठरतायत , असा कर्जत नगर परिषदेच्या ” कंट्रोलहीन ” कारभाराचा नगरसेवक ॲड संकेत दादा भासे यांनी पर्दाफाश केला.

             आज सोमवार दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ रोजी ” बाळासाहेब भवन ” येथे कर्जत नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते ” ॲड संकेत दादा भासे ” सहित विरोधी पक्षातील सर्व नगरसेवक जमा होऊन आपल्या प्रभागात विकास कामांना अडसर ठरणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा व पालिका प्रशासनाचा चांगलाच समाचार घेतला. स्वच्छता – कचरा – शौचालये , याकामी आरोग्य विभागाचे अधिकारी ” रायन ” तर विकास कामांत नगराध्यक्षा – उपनगराध्यक्ष – मुख्याधिकारी बेजबाबदारीने वागून कर्जतच्या विकासाला बाधा आणत आहेत. यापाठीमागे परिवर्तन विकास आघाडीचे नेते कारणीभूत असून ” राजकीय खुन्नसबाजी ” करत ” सूड ” घेत असल्याचे चित्र आहे , मात्र हि खुन्नसबाजी कर्जतच्या विकासाला ” अडसर ” ठरत असल्याचा आरोप नगरसेवक ॲड संकेत दादा भासे यांनी व्यक्त केला.

          यावेळी दहिवली प्रभाग क्रमांक ९ च्या नगरसेविका जान्हवी सुदेश देवघरे यांनी आमच्या विभागातील नागरिकांचा विचार करून विकासाला अडथळा आणू नका , अशी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना सूचना केली.

          प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेविका कोयल कन्हेरीकर यांनी तर आरोग्य विभागाचे अधिकारी ” रायन ” यांच्या विरोधात खूपच आगपाखड करत असा आरोग्य अधिकारी आमच्या डोक्यात गेला असून त्यांच्या बदलीची मागणी केली.

         प्रभाग क्रमांक ०१ च्या नगरसेविका अरुणा वायकर, किशोर कदम , यांनी देखील विकास कामांना बाधा येत असल्याचे सांगितले.

          प्रभाग क्रमांक ०८ चे नगरसेवक रामदास गायकवाड यांनी देखील दहिवली येथील आपल्या प्रभागाच्या व्यथा मांडल्या.

            प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक वैभव सुरावकर यांनी देखील म्हाडा कॉलनीतील समस्यांचा पाढा वाचून आपला संताप व्यक्त केला.

            प्रभाग क्रमांक ६ महावीर पेठ व बाजारपेठचे नगरसेवक रोहित ओसवाल , यांनी देखील नव्याने बसविलेल्या ट्रान्सफॉर्मर बसविताना कित्ती त्रास झाला , हे सांगत पालिकेतील नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

             यावेळी विरोधी पक्षनेते नगरसेवक ॲड. संकेत दादा भासे , भिसेगाव नगरसेवक विजय भाऊ हजारे , दहिवली नगरसेवक रामदास गायकवाड , मुद्रे नगरसेवक किशोर कदम , नगरसेवक रोहित ओसवाल , मुद्रे नगरसेविका अरुणा वायकर , दहिवली नगरसेविका जान्हवी देवघरे , कोतवाल नगर नगरसेवक वैभव सुरावकर , समर्थनगर नगरसेविका कोयल कन्हेरीकर , शिवसेना शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , शहर प्रमुख संजय मोहिते , प्रवक्ते रमाकांत जाधव , उप शहर प्रमुख दिनेश कडू , शहर संघटक नदीम भाई खान , संघटक सचिन भोईर , उप संपर्क प्रमुख नारायण जुनघरे , गुंडगे विभागप्रमुख पंकज पवार , स्वप्नील जाधव , कोमल म्हामुणकर ,त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

आता या संतप्त पत्रकार परिषदेनंतर सत्ताधारी परिवर्तन आघाडीची ” छाचू गिरी ” बंद होऊन कर्जतचा विकास होतो , की कसे ? अशी जोरदार चर्चा होत असून आता पुढे काय ? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!