…..” कर्जतमध्ये अखिल भारतीय बौद्ध महासंघ, शाखा ता. कर्जतच्या वतीने ” वर्षावास धम्मप्रवचन मालिका ” सांगता समारोप उत्साहात संपन्न “……
कर्जत ता. अध्यक्ष " सतीश देशपांडे " यांचे उल्लेखनीय नियोजन !

” संविधान हे वाचण्याचा नाही तर जाणण्याचा विषय आहे ” – संविधान अभ्यासक नुरखाँ पठाण सर
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
आपला ” भारत देश ” हा धर्मनिरपेक्ष देश आहे , हा देश ज्यांच्या हाती मतदानाच्या माध्यमातून देणार आहात , त्यांना ” संविधान ” माहित असणे गरजेचे आहे , कारण या एका मतात अडीच हजार वर्षांचा इतिहास – संघर्ष – त्याग लपलेला आहे , म्हणूनच जे मत विकतात ते ” लोकशाहीचे मारक ” आहेत. संविधान राबविणारे हात महत्वाचे तर , त्यांना तिथे मतांच्या माध्यमातून पोहचविणारे हात कित्ती महत्वाचे असतील , यावर प्रकाश टाकत , ” भारतीय संविधान हे वाचण्याचा नाही तर जाणण्याचा विषय आहे “, असे महत्त्वपूर्ण मत भारतीय संविधानाचे अभ्यासक ” नुरखाँ पठाण सर ” यांनी आज कर्जत मध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात आयोजित केलेल्या अखिल भारतीय बौद्ध महासंघ, शाखा ता. कर्जतच्या वतीने ” वर्षावास धम्मप्रवचन मालिका ” सांगता समारोप समारंभात व्यक्त केले.

यावेळी अखिल भारतीय बौद्ध महासंघ, शाखा ता. कर्जतचे अध्यक्ष सतीश देशपांडे , कार्याध्यक्ष गौतम गमरे , महासचिव मालू गायकवाड , कोषाध्यक्ष अरुण जाधव , संघटक दिनेश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षावास मालिका सांगता समारंभ रविवार दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता आयु. दत्ता बाबाजी जाधव (केंद्रीय उपाध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली होत असताना विचार पिठावर विशेष उपस्थिती मा. व्हि. जे. गायकवाड ( राष्ट्रीय महासचिव ) , मा. सुधाकर मेढे (अध्यक्ष, म.प्र.) मा. राहुल डाळिंबकर (मा. उपनगराध्यक्ष क.न.प.) आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सकाळी मान्यवरांच्या हस्ते पंचशीलाचे ध्वजारोहण , सूत्रपठण आयु. चंद्रकांत आप्पा साळवे , मनोहर बोदडे , गोपाळ जाधव, गौतम गमरे यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत आयु. सतीश देशपांडे – अध्यक्ष, ता. कर्जत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन दीप प्रज्वलित करण्यात आले.

यावेळी नुरखाँ पठाण सर यांनी वर्षावास आणि संविधान हे एकच विषय आहेत , मात्र यांत आत डोकावणे गरजेचे आहे . तथागत भगवान गौतम बुद्ध हे मार्गदाता होते , आज सारख्या अडीच हजार वर्षापूर्वी कुठलीच प्रसिद्धी माध्यम नसताना त्यांनी ” धम्म ” सर्वत्र पसरविला. धम्माच्या विचारांनी प्रबुद्ध व्हावे लागते हे सांगत त्यांनी आजही समाज व्यवस्था बदलली नाही , यावर प्रकाश टाकला. जात असणे वाईट नाही , मात्र यातील ” गोम ” एकच यांत उतरंड आहे , वर श्रेष्ठ, तर खाली तूच्छ अशी संस्कृती आहे . ईश्वर आणि आत्मा याची सांगड म्हणजेच धर्म , तर या दोघांना नाकारणारा जो विचार विवेकावर उभा आहे , तोच धम्म , अशी व्याख्या जी अपेक्षित होती , ते विचार भारतीय संविधानात लिहिले आहे , यावर नुरखाँ पठाण सर यांनी प्रकाश टाकला .
भारतीय संविधानात ” राजकीय , सामाजिक , आर्थिक ” नियोजनाची मांडणी केलेली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना तब्बल २ वर्षे ११ महिने १८ दिवस हे संविधान लिहिण्यास लागले , म्हणूनच त्यात अडीच हजार वर्षांची मांडणी आहे. ” न्याय , स्वातंत्र्य , समता , बंधुता ” , यावर आधारित संविधान आहे. वारकरी पंथात ” वारी ” मध्ये देखील कुठल्या जातीचे , असे न विचारता सर्वांना ” माऊली ” म्हणुन संबोधतात , असा विचार प्रथम तथागतांनी पेरला , छत्रपतींनी देखील अठरापगड जातीतील लढवय्यांना ” मावळा ” हा शब्द दिला व रयतेचे ” स्वराज्य ” घडविले. सन १८८२ साली ” महात्मा ज्योतिबा फुले ” यांनी मोफत व सक्तीचे शिक्षण याची मागणी त्याकाळी केली होती , मोफत शिक्षण हे अचानक निर्माण झालेले नसून , यांत महापुरुषांचा इतिहास आहे , हा विषय भाषणाचा नसून वाचनाचा आहे , असे सांगितले.

येथील जनता पहिले राजांचे – संस्थानिकांची प्रजा होती , मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ” संविधानाच्या ” माध्यमातून आपण ” नागरिक ” झालो . संविधानातील अनुच्छेद १५ च्या ३ मधून या संविधानाचा फायदा मोठ्या प्रमाणात महिलांना झाला आहे. त्यांना अनेक अधिकार मिळाले आहेत. ” चूल आणि मूल ” या बंधनातून त्यांनी उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकले आहे. अनेक सोई – सुविधा – सवलती त्यांना मिळाल्या. राजकारणात ३३ टक्के आरक्षण देत आहेत , हे बाबासाहेबांनी संविधानात लिहिले आहे , यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली. पूर्वी लिंग – धर्म – जात – वंश – जन्म स्थान यांवरून भेदभाव होत होता ,तो संविधानाच्या माध्यमातून संपुष्टात आला, असे संविधानातील सखोल विचार त्यांनी सोप्या आणि सरळ शब्दात कथन केला.

यावेळी मा. दिलीप मोरे (राष्ट्रीय कार्याध्यक्ष) , मा. अनंता शिंदे (राष्ट्रीय उपाध्यक्ष) , मा. सुरेखा कांबळे (RPI महिला ता. अध्यक्ष) , अलोक डाळिंबकर , सिद्धांत डाळींबकर ,किशोर जाधव , भगवान जाधव (उपाध्यक्ष, म.प्र.) , वसंत शिरसाट , इरेश्वर गायकवाड (गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर) , डॉ. नरेंद्र गायकवाड (एम.डी.) , दिपक खाडे सर , रमेश डोंगरे , राकेश गायकवाड (ता. अध्यक्ष खालापूर) , जयेश शिंदे (RPI रायगड जि. उपाध्यक्ष) , तर प्रमुख पाहुणे मा. दीपक भालेराव (सामा. कार्य.), उर्मिला खैरनार , सुनिल सोनावणे (RPI महासचिव), मनोज गायकवाड (RPI तालुका प्रभारी अध्यक्ष) , शांताराम सोनावळे , जितेंद्र जाधव , अरविंद गायकवाड , किशोर निकाळजे , डॉ. सविता संजय आष्टेकर, शाम मोरे , वैशाली भोसले (RPI महिला शहराध्यक्ष) , राहुल गायकवाड, अमर जाधव , प्रकाश अहिरे , मिलिंद मधाळे , संदिप भालेराव , मंगला खैरे , उज्वला मोरे , भाग्यश्री जाधव , रत्नमाला गायकवाड , राजश्री गायकवाड , रेखा धनावडे , डॉ. रुचिरा सतिश देशपांडे, मिनाक्षी दिनेश काकडे, आरती विशाल वाव्हळकर, सेजल सिद्धांत डाळिंबकर, महिला उपाध्यक्ष – सुजाता बोदडे , उपाध्यक्ष – मनोहर भोसले सर , संघटक – परशुराम पोटफोडे , संघटक – रमेश येवले , उपाध्यक्ष – दादाभाऊ मोहिते , उपाध्यक्ष – विलास बागूल सर , सचिव – शिवाजी कावरे , संघटक – रुपेश गायकवाड , संघटक – गौतम वैराळ , सचिव – रणजित अहिरे , सचिव – राम मस्के , लेखापाल – विश्वनाथ गायकवाड , त्याचप्रमाणे प्रेमा विजय रोकडे – (यशोधरा महिला मंडळ अध्यक्ष) , वनिता गायकवाड (यशोधरा महिला मंडळ उपाध्यक्ष) , निशा मनोज निकम (खजिनदार) , उर्मिला देशपांडे , सिमा किशोर जाधव , उज्वला दिपक सोनावणे, सुजाता सुनिल देठे , बिलाल आढाळ , अमीर मणियार , अनेक मुस्लिम बांधव व मोठ्या संख्येने बौद्ध बांधव , महिला वर्ग उपस्थित होते.




