टॉप न्यूज़

……” ऐन दिवाळीत ठाकरे शिवसेनेच्या उद्याच्या बाजारपेठा बंदला भाजपचे नेते किरण दादा ठाकरे यांचा विरोध “…..

शिवसेना उबाठा व परिवर्तन आघाडीच्या या बंद च्या भूमिकेचा जाहीर निषेध ! 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या परिवर्तन आघाडीने केलेल्या ऐन सणासुदीत व दिवाळीच्या तोंडावर कर्जत तालुका बंदला भारतीय जनता पक्षाचे विधानसभा प्रमुख तथा भाजप नेते ” किरण दादा ठाकरे ” यांनी तीव्र ” विरोध ” दर्शवून या भूमिकेचा जाहीर ” निषेध ” केला आहे. आज रविवार दिनांक ०१ नोव्हेंबर २०२६ रोजी वांजळे येथील त्यांच्या भाजप संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी संतप्त होत मत व्यक्त केले.

          भाजप नेते किरण दादा ठाकरे पुढे म्हणाले की , ऐन सणासुदीत दुकाने बंद करून व्यापारी वर्ग , स्थानिक दुकानदार , फेरीवाले , ग्राहकांचे फार मोठे नुकसान होते . आजचा दिवस पुन्हा येत नसल्याने दुकाने , बाजारपेठा बंद असल्याने ग्राहक अन्य ठिकाणी खरेदी करण्यास जात असल्याने यांत सर्वांचेच नुकसान होते. तर हातावर पोट भरणारे काय करणार ? अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. 

          कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात टोरेंट वीज प्रकल्पामुळे केलेल्या वृक्ष तोडीस विरोध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या परिवर्तन विकास आघाडीने सोमवार दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ रोजी पुकारलेला कर्जत तालुका बंद पुकारलेला आहे . याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली. या विरोधात आपण व भाजप पक्ष असून त्यांची हि भूमिका चुकीची असून याचा आम्ही विरोध दर्शवून निषेध व्यक्त करत असल्याचे भाजप नेते किरण दादा ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!