टॉप न्यूज़

…..” कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी फातिमा 86 नोबेल ट्रस्ट देणार त्यांच्या पंखाना बळ “……

सागाची वाडी व चोचीची वाडी शाळेमध्ये " ई लर्निंगसाठी 42 इंची स्मार्ट टीव्ही " सेट भेट !

कर्जतच्या माजी नगराध्यक्षा ” सौ. सुवर्णा केतन जोशी ” यांचे विशेष प्रयत्न……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी ” फातिमा 86 नोबेल ट्रस्ट ” ठाणे यांच्या वतीने राजिप शाळा सागाची वाडी व चोचीची वाडी या शाळेतील विद्यार्थ्यांना ” आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात ” शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या पंखाना ” बळ ” देणार असून त्यामाध्यमातून त्यांनी शाळेमध्ये ई लर्निंग साठी 42 इंची ” स्मार्ट टीव्ही ” सेट भेट नुकताच देण्यात आले. कर्जत नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा तथा ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा संघटिका ” सौ. सुवर्णा केतन जोशी ” यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

          अती दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात मुख्य ” प्रवाहात ” आणण्यासाठी आणि तांत्रिक दृष्ट्या ” सक्षम ” करण्यासाठी फातिमा 86 नोबेल ट्रस्ट, ठाणे यांचा हा अविस्मरणीय प्रयत्न आहे. कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ” सागाची वाडी आणि चोचीची वाडी ” येथे जावून 42 इंची स्मार्ट टीव्ही सेट कर्जतच्या माजी नगराध्यक्ष आणि नगरसेविका सौ. सुवर्णा केतन जोशी यांच्या हस्ते शाळेतील शिक्षक आणि विध्यार्थ्यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊ देखील वाटप करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आमच्या प्रयत्नांचे यश आहे , आणि ते बघण्यासारखे आहे , असे मत यावेळी सौ. सुवर्णा जोशी यांनी व्यक्त केले. 

           याप्रसंगी ट्रस्ट चे चेअरमन सुदेश जाधव , संजीव पाटील , प्रशांत परदेशी , ॲड. शिल्पी परदेशी , राजेश सिन्हा , अर्णव परदेशी , मुख्याध्यापक मुख्याध्यापिका श्री व सौ वाडीले, विनोद नारागुडे , प्रशांत कराळे , सुनील पिल्लई , नाना ढाकवळ , तसेच व्यवस्थापन समिती अध्यक्ष व या उपक्रमात भरीव योगदान असलेले फातिमा 86 च्या बॅचचे विश्वनाथ गोखले आणि त्यांची पत्नी या कार्यक्रमासाठी खास पुण्याहून आले होते. 

         याप्रसंगी मुलांना पौष्टिक खाऊ वाटप करण्यात आला. मुलांनी गाणी, कविता, गोष्टी सादर करून आनंद व्यक्त केला तर ट्रस्ट चे आभार व्यक्त केले. एकाच बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून स्थापन केलेली ही ट्रस्ट आणि त्यांचे हे समाजकारण खूपच कौतुकास्पद आहे , असे गौरोदगार शाळेचे मुख्याध्यापक यांनी व्यक्त करून सर्वांचेच आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!