टॉप न्यूज़

……” निराधारांची माऊली – सुनील गोगटे यांची सावली , कर्जतमध्ये भाजप नेत्या स्नेहा गोगटे यांचे दुःखद निधन “…..

गोगटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला !

त्यांच्या ” अंत्यविधीस ” सर्व क्षेत्रातील अनेकजण उपस्थित…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

आपल्या नावाप्रमाणेच सर्वांशी ” स्नेह ” वाढवून आपुलकीने व प्रेमाने वागणूक देणाऱ्या ” निराधारांची माऊली – सुनील गोगटे यांची सावली ” भाजप नेत्या कर्जत नगर परिषद हद्दीतील विठ्ठल नगर येथील ” स्नेहा सुनिल गोगटे ” यांचे वयाच्या ४१ व्या वर्षी सोमवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी त्या त्यांच्या घरी असताना अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. हि दुर्दैवी घटना काही मिनिटात घडल्याने त्यांच्या अकाली निधनाने गोगटे कुटुंबीय, मित्रपरिवार , परिसरात आणि राजकीय क्षेत्रात सर्वांवरच दुःखाचा डोंगर कोसळला. 

           गेली अनेक वर्षे ते भारतीय जनता पक्षात कार्यरत होत्या. महिला आघाडीच्या कार्यकर्त्या , भाजप कर्जत शहर अध्यक्षा , कर्जत तालुका अध्यक्षा, जिल्हा संघटक अशी विविध पदावर त्यांनी भाजप पक्षात यशस्वी कारकीर्द करून पक्ष कर्जत तालुक्यात सर्वत्र पसरवला. कोरोना काळात देखील त्यांनी उल्लेखनीय काम केले. आपल्या परिसरात कोरोना लसीकरण शिबिर , सैनीटायझर वाटप , अन्न – धान्य , वस्तू वाटप , करून नागरिकांना आधार दिला. कर्जतकर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या नेहमीच हिरीरीने भाग घेत असत . आपले पती भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या पाठीशी सावली सारख्या असायच्या. 

         सोमवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ हा दिवस अखेर त्यांचा काळ ठरला. संध्याकाळी त्या आपल्या विठ्ठलनगर येथील फ्लॅटवर घरात होत्या. टिव्हीवर कार्यक्रम बघत असताना मुलगा सर्वेश व सून दूध आणण्यासाठी बाजारात गेले होते. त्याचवेळी त्यांचे पती सुनील गोगटे यांना फोन आल्याने ते मोबाईल वर बोलत घरातील दुसऱ्या खोलीत गेले , बाजारातून परत आलेल्या मुलाने घराची बेल वाजवली , मात्र आई दरवाजा उघडत नसल्याने त्याने वडिलांना कॉल केला , सुनील गोगटे बाहेर आले असता त्यांची पत्नी स्नेहा या सोफ्यावर बसलेल्या दिसल्या. त्या काहीच हालचाल करत नसल्याने त्या झोपल्या असाव्यात, असे समजून त्यांनी त्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने स्नेहा यांना जवळच असलेल्या जैन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

           सुनील गोगटे यांना देखील या अनपेक्षित घटनेने , क्षणात हे काय घडले , म्हणून शॉक बसला . भाजप नेत्या स्नेहा गोगटे यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताच त्यांचे कुटुंबीय नातेवाईक – मित्रपरिवार – प्रभागातील नागरिक – राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी , कार्यकर्ते – आणि अनेक कर्जतकर यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. पत्नीला समोर गमावल्याच्या दुःखाने त्यांचे अश्रू अनावर झाले. त्यांच्या आक्रोशाने उपस्थितांचेही देखील मन हेलावून गेले.

          स्नेहा गोगटे यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कर्जत शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मंगळवारी झालेल्या अंत्यविधीस मोठ्या संख्येने राजकीय – सामाजिक – शैक्षणिक – धार्मिक – सांस्कृतिक – व्यापारी क्षेत्रातील अनेकजण दुःखद अंतःकरणाने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!