टॉप न्यूज़

……” कर्जत तालुक्यात टोरेंट वीज प्रकल्पाला विरोध की आश्रय ? “……

टोरेंटो ला पडद्यामागून वरदहस्त कुणाचा ?

स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध असताना प्रकल्पाचे काम गतिशील कसे ? कर्जतमध्ये घुमतोय संतप्त सवाल…… 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यात ” टोरेंट वीज प्रकल्प ” हा येथील पर्यावरण व जनजीवन उध्वस्त करणाऱ्या प्रकल्पाला पडद्या मागून कुणाचा वरदहस्त आहे ? स्थानिक भूमिपुत्रांचा , नागरिकांचा , शेतकरी बांधवांचा विरोध असताना टोरेंट प्रकल्पाचे काम गतिशील कसे ? असा कर्जतमध्ये संतप्त सवाल घुमत आहे. केंद्राने व राज्यात महायुतीने याला मंजुरी दिलेली असेल म्हणूनच येथील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष विरोध करत नसल्याचे येथे चित्र दिसत असून त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. स्थानिक प्रकल्पबाधित गावातील भूमिपुत्रांचा या टोरेंट प्रकल्पाला विरोध असताना व याविरोधात प्रचंड ” असंतोष ” असताना या प्रकल्पाची कामे दिवसेंदिवस ” गतिशील ” होत असून आता तर वृक्ष तोडीस देखील सुरुवात केलेली आहे. या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना पडद्यामागून कोण सहकार्य करत आहे ? प्रमुख विरोधी पक्ष असलेला ” ठाकरे सेना ” याविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन का छेडत नाही ? हा संशोधनाचा विषय सध्या कर्जत तालुक्यात संतापजनक चर्चेचा विषय ठरत आहे .

         टोरेंट वीज प्रकल्पासाठी हवी असलेल्या जमिनीचा सर्व्हे , त्याची पाहणी , मोजणी , वृक्षतोड बिनदिक्कत येथील महसूल व वन अधिकाऱ्यांना , हाताशी धरून केली जात आहेत . बाहेरून आलेली हि माणसे स्थानिकांचा विरोध असताना अशी कशी हिंमत करतात ? याचा अर्थ त्यांना येथील पडद्या मागचे ” व्हिलन ” सहकार्य करत आहेत . येथील बाधित गावातील जिल्हा परिषद शाळांना टोरेंट वीज प्रकल्पाचे अधिकारी येथील प्रमुख शासकीय अधिकारी वर्गाला प्रमुख पाहुणे बोलावून शाळेला शैक्षणिक साहित्य वाटत आहेत . जनसमुदायांचा विरोध असताना पोलीस ठाणे , तहसील कार्यालय येथील अधिकारी अशा कार्यक्रमाला जातात तरी कसे ? याची चौकशी व त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे वाटते .

          कर्जत तालुक्यातील सत्ताधारी तिन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी वर्गाने या प्रकल्पांना विरोध की सहकार्य ? हि भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही , त्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद वाटते . वृत्तपत्रात , यू ट्यूब , सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्यांमुळे नक्कीच येथील कुणीतरी पडद्यामागून सूत्र हलवित असून बातम्या प्रसारित करत आहे. अर्ध्या तालुक्यातील शेत जमिनीतून या टोरेंट वीज प्रकल्पाचे टॉवर उभे रहाणार असल्याने अनेकांची शेत जमीन बाधित होणार आहे , त्यामुळे तालुक्यात असंतोष असताना याला विरोध असताना अश्या प्रकल्पाला आश्रय कोण देत आहे ? त्यांची नावे समोर येणे गरजेचे वाटते , तर यासाठी आता या प्रकल्पाच्या विरोधातील संघटनांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याची गरज वाटत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!