टॉप न्यूज़

……सन्मान स्वच्छता दूतांचा – युगे न युगे योगदानांचा “…..

" सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ " कर्जतच्या वतीने " आरोग्य सेवकांचा " सत्कार !

कर्जत नगर परिषदेचे मुकादम ” निकेश फाळे व सहकाऱ्यांचा ” आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या हस्ते गौरव…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

सकाळची वेळ , सारी कर्जत नगरी कुणी झोपेत , तर कुणी कामावर निघालेली मात्र आरोग्याचे खरे शिलेदार कर्जत शहर स्वच्छ करण्याच्या मागे हात धुवून पडलेली असते. आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आरोग्य सेवक दररोज पहाटेपासून मेहनत घेत असतात. रस्ते – परिसर – चौक – गल्ल्या – मंदिर परिसर – स्मारक परिसर – शौचालये आदी इतर बाजारपेठा स्वच्छ करून वातावरणात प्रसन्नता आणण्याचे अथक मेहनत घेत असतात. ऊन असो , वारा असो , पाऊस असो की कोरोना सारखे जीवघेणे आजार असो की कुठले सण – उत्सव असो , नागरिकांचे आरोग्य ” युगे न युगे ” सुरक्षित रहावे , यासाठी झटत असतात. या हातांना देखील शाबासकी मिळावी , यासाठीच गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कर्जतच्या वतीने या ” रत्नांचा ” सत्कार कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या शुभहस्ते नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

           कर्जत नगर परिषदेचे मुकादम निकेश फाळे आणि त्यांचे सहकारी श्रीकांत वाघेला , विश्वदीप रणदिवे , सुरज वाघेला, आकाश परदेशी , दिनेश भालेराव , राहुल गायकवाड , टारझण काकडे व इतर स्वच्छता दूतांचा गौरव याप्रसंगी सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. याप्रसंगी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत नगरसेवक ॲड संकेत दादा भासे , नगरसेवक विजय भाऊ हजारे , नगरसेविका सौ. जान्हवी देवघरे, नगरसेवक वैभव सुरावकर , नगरसेवक किशोर कदम , नगरसेविका सौ. अरुणा वायकर , नगरसेवक रामदास गायकवाड , नगरसेवक ॲड रोहित ओसवाल , व सागमं चे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.

 

         आज एक कचऱ्याचा तुकडा विल्हेवाट लावण्यास शासन दरबारी लाखो रुपये खर्च येत असल्याने स्वच्छता करणे , हे फक्त आरोग्य सेवकांची जबाबदारी नसून , ती आज प्रत्तेक नागरिकांची देखील खूप मोठी कामगिरी आहे. स्वच्छता दूतांचे नेहमीच युगे न युगे योगदानांचे वलय यामागे असते आणि म्हणूनच हे देशव्यापी कार्य कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

          सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कर्जतने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती , मान्यवर , सामाजिक संस्थांचा सन्मान याप्रसंगी करण्यात आले. ” स्वच्छता दूतांचा ” सन्मान म्हणजे ते करत असलेली देशसेवा असून त्यांच्या कार्याचा व लोकसेवेची ही पावती असल्याचे मत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी व्यक्त केले. भविष्यात नागरिकांनी देखील या स्वच्छता मोहिमेस त्यांना सहकार्य करावे , असे आवाहन देखील आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केले , व सर्व स्वच्छता सेवकांना शाबासकी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!