टॉप न्यूज़

…..” एक कॉल – प्रॉब्लेम सॉल , बाजारपेठेतील शिवसेनेचा उगवता चेहरा – नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत शहरात एक ” नगरसेवक ” असा आहे की, जो दिवसभर होलसेल कपड्याचा मोठा व्यापारी, तर एक यशस्वी वकील पण मनाने मात्र २४ तास समाजसेवक. ” एक कॉल – प्रॉब्लेम सॉल ” अशी जबरदस्त काम करण्याची पद्धत असलेला कर्जत बाजारपेठेतील ” शिवसेनेचा ” उगवता चेहरा म्हणजेच नगरसेवक ” ॲड. रोहित राजेंद्र ओसवाल “.

         काही लोक निवडून येऊन नगरसेवक झाल्यावर दिसेनासे होतात, मात्र रोहित ओसवाल यांनी नगरसेवक पदाची व्याख्या बदलून टाकली आहे. जेव्हापासून ते नगरसेवक झाले आहेत, तेव्हापासून प्रभाग क्रमांक ६ महावीर पेठ आणि संपूर्ण बाजारपेठेचा चेहरामोहरा बदलला आहे. नागरिकांच्या समस्या कर्जत नगर परिषदेच्या कर्मचारी , कामगारांच्या माध्यमातून ” चुटकी ” सारखी सोडवतात. कुठलेही काम वेळेत होणे , म्हणजेच समस्या सुटणे होय.

           कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ सदाशिव थोरवे ” यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेते तथा कर्जत नगर परिषदेचे गटनेते ” ॲड. संकेत दादा भासे ” यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक ” ॲड. रोहित ओसवाल ” कर्जत बाजारपेठेत शिवसेनेची ताकद वाढवत आहेत. पक्षाला अधिक बळकटी येण्यासाठी नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल यांच्या सारख्या तरुण – सुशिक्षित – उद्योजक – काम करण्याची इच्छा असलेल्या समाजसेवकाला जेवढी संधी व ताकद देता येईल , तेवढी देणे म्हणजेच बाजारपेठेत शिवसेनेची ताकद वाढविणे , असे चित्र पाहण्यास मिळत आहे.  

       बोलण्यापेक्षा कामावर विश्वास ठेवणारा नगरसेवक रोहित ओसवाल यांनी केलेली काही ठळक विकासकामे – १) शनी मंदिर परिसराचा कायापालट – नदी घाटावर संरक्षण ग्रिल बसवले, नदी स्वच्छता मोहीम राबवून नदीतील घाण साफ केली , येथील गार्डन स्वच्छ करून हाय-मास्क लाईट लावले, नवीन स्ट्रीट लाईट लावले आणि दर्ग्याकडे जाणारा चिखलाने भरलेला रस्ता जेसीबी लावून लेव्हलिंग करून दिला.

२) रस्ते आणि पायाभूत सुविधा – पुण्योदय हॉल येथील अनेक वर्षांपासून खराब असलेला रस्ता नव्याने डांबरीकरण केला. जैन मंदिर ते राधाकृष्ण मंदिर आणि मेन रोड ते पुण्योदय हॉल हा रस्ता आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिलेल्या निधीच्या माध्यमातून पूर्ण करून घेतला.

३) प्रकाश आणि सुरक्षा – कपालेश्वर अपार्टमेंट येथील शाह यांच्या गल्लीत वर्षानुवर्षे लाईट नव्हती, तिथे नवीन पोल बसवले. कपालेश्वर ते पाटील आळी रस्त्यावर नवीन लाईट, लक्ष्मीनारायण मंदिर येथे स्ट्रीट लाईट, दर्गा येथील महिन्याभर बंद असलेली लाईट दुरुस्त केली. वॉर्ड नं. ६ मधील गटारांवर झाकण-ग्रिल बसवले.

४) स्वतःच्या खिशातून काम – Axis Bank येथील चेंबरवरील ग्रिल अनेक दिवसांपासून तुटले होते, ते नगरसेवक रोहित ओसवाल यांनी स्वतः खर्च करून लावले.

५) व्यापाऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न – बाजारपेठेतील व्यापारी आणि रहिवाशांची व्होल्टेजची अनेक वर्षांची तक्रार होती. त्यासाठी ” ६३० KVA ” चा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम सुरू करून दिले. वन वे बाजारात ट्रॅफिक नियोजन केले, स्टेशन परिसर आणि जैन मंदिर, स्टेशन बाहेरील अनधिकृत फलक-पट्टी काढल्या.

६) स्वच्छता हेच संस्कार – कपालेश्वर, मटण-मच्छी मार्केट येथील गटाराचे पाणी घरात शिरायचे, ते साफ करून शौचालयाची टाकी साफ केली. येथील सार्वजनिक शौचालयात नवीन लाईट आणि नळ बसवले. जुनी नगरपालिका बाजारातील कचरा पेटी काढली, जुनी पोलीस लाईन परिसर जो अनेक वर्षे साफ झाला नव्हता, तो कर्जत न. प. चे स्वच्छता अधिकारी सोबत कामगारांना घेऊन , स्वतः उभा राहून साफ करून घेतला. स्टेशन परिसरातील झाडांच्या फांद्या छाटल्या, भाविक अपार्टमेंट येथील धोकादायक झाड काढले.

७) सामाजिक बांधिलकी – कर्जत शहरातील श्री गणपती विसर्जन घाट जनसेवा युवा मंचच्या टीमसोबत स्वच्छ केला. गेल्या वर्षी गणपती उत्सवापूर्वी शहरातील खड्डे बुजवले. गणेशोत्सवात गरिबांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेऊन स्वस्तिक दिवे भेट म्हणून दिले.

         असा नगरसेवक कुठे सापडेल ? जो एकीकडे मोठा उद्योजक, वकील असूनही, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दिवस रात्र झटत असतो , म्हणूनच असा उमदा नगरसेवक रोहित ओसवाल सारख्या तरुणांना पक्षात ताकद देणे गरजेचे वाटते. तरच शिवसेना बाजारपेठेत विकासा बरोबरच शिवसेनेच्या ” भगव्यानेही ” चमकेल , हेच त्रिवार सत्य असेल. म्हणूनच नगरसेवक ॲड . रोहित राजेंद्र ओसवाल यांच्या या कार्याची चर्चा मात्र सर्वत्र होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!