……” पर्व पर्युषण निमित्त आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी जैन मंदिर कर्जत येथे घेतले दर्शन “……

सर्व जैन बांधवांना दिल्या शुभेच्छा…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
जैन समाजाचा ” पर्व पर्युषण ” हा उपवास ठेवण्याचा व क्षमा मागण्याचा पवित्र सण सुरू झाला आहे. या दिवसांत भजन – किर्तन सुरू असते. ८ सप्टेंबर २०२६ पासून हा सण सुरू झाला असताना आज सोमवार दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी पर्व पर्युषण निमित्त कर्जतमध्ये जैन मंदिरात दर्शन घेण्यासाठी कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी भेट दिली.

यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , गटनेते तथा नगरसेवक ॲड. संकेत दादा भासे , सराफ असो. चे अध्यक्ष मोहन शेठ ओसवाल , नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल , शहर संघटक नदीम भाई खान, रोहित बाफना , विक्रम जैन , अश्विन जैन यांनी जैन मंदिर येथे उपस्थित राहून दर्शन घेतले.
.
यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी उपस्थित जैन बांधवांना पर्युषण पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.






