दिल्ली NCR

…..” श्री गणेशोत्सवानिमित्त मुद्रे येथील गणेश घाट नगरसेवक किशोर कदम यांच्या उपस्थितीत केला स्वच्छ “…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

सध्या सर्वत्र ” श्री गणेशाच्या ” आगमनाची धाम धूम आहे. यानिमित्ताने कर्जत नगर परिषद हद्दीतील ” मुद्रे ” या प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक ” किशोर कदम ” यांच्या नेतृत्वाखाली येथील श्री गणेश विसर्जन होत असलेल्या गणेश घाटाची स्वच्छ करण्यात आली.

          आपल्या मुद्रे प्रभागातील नागरिकांना श्री गणेश बाप्पाचे विसर्जन सुस्थितीत करता यावे , यासाठी कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यासाठी विरोधी पक्षनेते ॲड संकेत दादा भासे व येथील शिवसेनेचे नगरसेवक किशोर कदम यांच्या मागणीनुसार हि स्वच्छता करण्यात आली.

           मुद्रे प्रभागात श्री गणेशाचे आगमन झाले आहे. कुणा गणेश भक्तांकडे दिड दिवस तर कुणाकडे ५ दिवसांचे गौरी आगमन व कुणाकडे १० दिवसांचे बाप्पा विराजमान असतात. आपल्या प्रभागातील नागरिकांना तसेच महिला वर्गाला श्री गणेशाचे विसर्जन सोहळा व्यवस्थित होण्यासाठी या गणेश घाटाची नगरसेवक किशोर कदम यांनी स्वतः उपस्थित राहून स्वच्छता करून घेतली.

          कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांनी हि स्वच्छता करून देण्यात आल्याने त्यांचे गटनेते ॲड संकेत दादा भासे व स्थानिक मुद्रे येथील नगरसेवक किशोर कदम यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!