…..” हितेश कृष्णाजी थोरात यांचा ५० वा वाढदिवस अरिहंत अलोकी – कर्जत येथे मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा “…..

” अभिष्टचिंतन सोहळ्यात ” अनेकांची हजेरी , सर्वांनी दिल्या शुभेच्छा !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव प्रभागातील अरिहंत अलोकी या गृहनिर्माण सोसायटीत राहणारे ” हितेश कृष्णाजी थोरात ” यांचा वाढदिवस सोमवार दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. ५० वा जन्म दिनाचे औचित्य साधून हा वाढदिवस ” अरिहंत अलोकी क्लब हाऊस ” येथे साजरा करण्यात आला.
तथागत भगवान गौतम बुद्ध , महामानव – विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून हितेश थोरात यांचे त्यांची पत्नी प्रिया यांनी औक्षण करून हितेश यांच्या शुभहस्ते केक कापण्यात आला. याप्रसंगी त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांनी देखील त्यांचे औक्षण केले.

हितेश थोरात हे बेस्ट डेपो मुंबई – कुलाबा येथे ड्रायव्हर म्हणून कामाला असून त्यांची १८ वर्षे सेवा झाली आहे. ते उच्चशिक्षित व अत्यंत शांत स्वभावाचे नेहमी हसतमुख असलेले हितेश यांच्या सोबत सावली सारखी असलेली त्यांची पत्नी ” प्रिया ” व मुलगी ” स्वरा ” यांच्या सोबत कर्जत मध्ये वास्तव्यास आहेत. कोरोना काळात देखील त्यांनी ३ महिने ” के इ एम हॉस्पिटल ते बदलापूर ” अशी ड्युटी करून ” देशसेवेचे ” कार्य करून आपले कर्तव्य निभावले होते. मूळ गाव तासगाव जिल्हा सांगली येथील ते रहिवाशी असून दिवंगत आई आक्का ताई व वडील कृष्णाजी यांचे ” आशीर्वाद ” नेहमीच त्यांच्या पाठीशी असल्याचे ते सांगतात.

याप्रसंगी अनेक मान्यवर , मित्र परिवार , त्यांचे भाऊ , बहीण , साडू मेव्हणे , आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य , अरिहंत अलोकी येथील रहिवासी उपस्थित राहून त्यांना त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
अनेकांनी भेट वस्तू , पुष्पगुच्छ , देवून त्यांच्या आनंदात सहभागी झाले. यावेळी विविध गाण्यांवर डान्स करून या वाढदिवसाची मजा सर्वांनी लुटली. या अविस्मरणीय वाढदिवसात अल्पोपहार , सरबत व स्वादिष्ट जेवणाची उत्तम सोय ” विक्की गुप्ता केटरर्स ” यांच्या मार्फत करण्यात आली होती.





