…..” ये तो होना ही था , एका म्यानात दोन तलवारी कश्या रहाणार ? “……
अखेर उपजिल्हा प्रमुख " नितीन दादा सावंत " यांनी सोडले मौन !

” सुधाकर भाऊ घारे ” यांच्याशी दिलजमाई करून ” नितीन दादा सावंत ” यांचे ” राजकीय डावपेच ” चुकले का ? कर्जतमध्ये चर्चेला उधाण…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
नुकतीच ” शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ” पक्षाचे उपजिल्हा प्रमुख व २०२५ साली कर्जत विधानसभा मतदार संघातून महाआघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवारी लढलेले ” नितीन दादा सावंत ” यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा परिवर्तन विकास आघाडीचे विधानसभेचे अपक्ष उमेदवार ” सुधाकर भाऊ घारे ” यांच्यावर भर पत्रकार परिषदेत आरोपांची गरळ ओकली , त्यामुळे या पत्रकार परिषदेचा या मतदार संघात चांगलाच ” बाऊ ” झाला . त्यामुळे कर्जत नगर परिषद व जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत हे संभाव्य आमदारकी निवडणुकीचे उमेदवार एकत्र येऊन ” कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे ” माध्यमातून आपले प्रतिस्पर्धी आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांना पाणी चाखले होते. ती आघाडी आता तुटते की काय ? अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे. कर्जत नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदा सहित बहुमताने हि निवडणूक जिंकली होती , तर जिल्हा परिषद ०६ व पंचायत समिती निवडणुकीत १० उमेदवार निवडून आणून निर्विवाद यश या परिवर्तन विकास आघाडीचे दिसून आले. मात्र तब्बल ८ महिने शांत असलेल्या या परिवर्तन विकास आघाडीत आता ” असंतोषाचे वारे ” वाहू लागले आहेत. हेच आता उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांच्या पत्रकार परिषदेतून दिसून येत आहे , त्यामुळे या आघाडीत पडलेल्या ” ठिणगीत ” आगडोंब उसळतो की काय ? हे लवकरच समजणार आहे.

अस म्हणतात की , ” एका म्यानात दोन धारदार तलवारी राहू शकत नाहीत “, हेच या पत्रकार परिषदेतून दिसून आले. विषय ही असाच आहे , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांना ” आमदार ” व्हायचं आहे , तसेच ठाकरे सेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांना देखील ” आमदार ” व्हायचं आहे . पुढील विधानसभेच्या निवडणुकीत हे दोघेही उमेदवार असतील , म्हणूनच त्यांची राजकीय गणिते देखील तशीच आहेत. फक्त ६ हजाराच्या फरकाने पराभव झालेले सुधाकर भाऊ घारे हे वेगवेगळे फंडे – विविध कार्यक्रम , आंदोलने , विकास कामांची मंजुरी , इतर कार्यक्रम राबवून जनतेमध्ये आपल्या बद्दल ” विजयी ” मतांची आखणी करत आहेत. त्याच पद्धतीने राज्यात प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेले ठाकरे सेनेचे उमेदवार नितीन दादा सावंत यांना देखील योग्य भूमिका घेऊन जनतेच्या मनात राहून पुन्हा एकदा उमेदवारी लढवायची असल्याने मतदार संघात परिवर्तन विकास आघाडीत ” दादा – भाऊ ” मात्र , राज्यात प्रमुख विरोध पक्ष असल्याने ” विरोधी पक्षाची ” भूमिका देखील नितीन दादा सावंत यांना पार पाडावी लागत आहे.
नगर परिषद – जिल्हा परिषद – पंचायत समिती यांमध्ये परिवर्तन विकास आघाडी म्हणून एकत्र आलेले राष्ट्रवादी व ठाकरे सेना हे दोन्ही पक्ष विभिन्न विचार सरणीचे आहेत. स्थानिक पातळीवर जरी विचार पटवून घेतले गेले तरी नगर परिषद , जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या गोळा बेरजेतून ” जन मताचा कौल ” हा विधानसभेच्या निवडणुकीच्या ” मार्गाकडे ” जात असल्याने परिवर्तन विकास आघाडीचे या दोन्ही नेत्यांची इथेच खरी ” गोची ” दिसून येत आहे. ” राजकीय फंडे ” , प्रसिद्धी मिळवून मतांच्या गोळा बेरजेत ” तागडीचा तराजू ” वर खाली करणारा असल्याने सुधाकर भाऊ घारे ” वरचढ ” ठरले तर नितीन दादा सावंत हे खाली येणार असल्याने राष्ट्रवादीने उड्डाण पूल मंजुरी , रोजगारीचा महा एल्गार , गोदरेज – टाटा स्टील कंपनीच्या विरोधात ठोकलेली आरोळी , कर्जतमध्ये नाट्यगृहाची केलेली पाहणी , यामुळे नितीन दादा सावंत यांना ” विचारात न घेता ” घेतलेले निर्णय असल्याने त्यांच्या ते चांगलेच जिव्हारी लागले असून , म्हणूनच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या विरोधात चांगलीच संतापाची व आरोपांची गरळ ओकली. मात्र याचा थेट परिणाम परिवर्तन विकास आघाडीवर होणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ” ये तो होना ही था ” अशी चर्चा मात्र या मतदार संघात चांगलीच रंगली असून ” मातोश्री ” वरुण येणाऱ्या आदेशावर चालणारा ” शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष “, कर्जत परिवर्तन विकास आघाडीत सामील होण्याचा घेतलेला निर्णय , योग्य होता की अयोग्य ? याची आता आत्मपरीक्षण करण्याची गरज येवून ठेपली आहे.




