…..” भिसेगाव ग्रामस्थांचा भुयारी मार्गासाठी केलेला ” रक्तपाती आंदोलन ” वाया जाऊ देणार नाही , दिनेश भरकले यांचे पालिका व रेल्वे प्रशासनाला आवाहन “…..
आम्हाला भिसेगाव - कर्जत " भुयारी मार्गच " हवा !

” कर्जत नगर परिषद व रेल्वे प्रशासनाच्या ” या निर्णयाचा केला तीव्र शब्दात निषेध…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
नुकतेच सोशल मीडियावर गुंडगे – आकुर्ले उड्डाण पुल होणार याबाबतीत बातम्या प्रसिद्ध होत आहेत , मात्र ४० वर्षांपासून आमची एकच कर्जत नगर परिषद व रेल्वे प्रशासनास मागणी होती की , आम्हाला दैनंदिन मूलभूत गरजेसाठी ” कर्जत – भिसेगाव भुयारी मार्ग ” व्हावा. आमच्या ज्येष्ठ नागरिक व महिलांनी केलेले ” रक्तरंजित आंदोलनं ” असे वाया जाऊ देणार नसून आम्हाला आमच्या भिसेगाव व गुंडगे प्रभागातील नागरिकांना उपयोगाचा नसलेला गुंडगे – आकुर्ले उड्डाण पुलाची गरज नसून भिसेगाव येथे ” भुयारी मार्गच ” फायद्याचा असल्याने , या बिनकामाच्या उड्डाण पुलास आमचा विरोध आहे.
४० वर्षांपूर्वी भिसेगाव गुंडगे ग्रामस्थानी , महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य – शिक्षण – बाजारहाट – शासकीय कामांसाठी केलेला भुयारी मार्गासाठी ” रक्तपाती आंदोलन ” हा आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कर्जत नगर परिषद प्रशासन व रेल्वे प्रशासन या मागणीला ” मुठमाती ” देत असून आमच्या मागणीचा विचार करताना दिसत नाही. आम्हाला राजकारण करायचं नाही , पण धन दांडग्याच्या वाहतुकीसाठी आम्ही हा मार्ग मागत नसून आमच्या जीवन मरणाच्या ज्या गोष्टी आहेत , त्या बघूनच आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी हा आंदोलन छेडला असताना , त्यांचे हे ” रक्तरंजित आंदोलनं ” आम्ही वाया जाऊ देणार नाही , म्हणूनच या ” गुंडगे – आकुर्ले ” उड्डाण पुलाला आमचा भिसेगाव ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे , असे संतापजनक मत भिसेगाव ग्रामस्थ दिनेश भरकले यांनी व्यक्त केले आहे.

कर्जत नगर परिषद व रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.




