दिल्ली NCR

…..” दृष्टीहीन MPSC विद्यार्थिनी निकिता विष्णू शेंडे हिला टॅबलेट भेट देऊन सुधाकर भाऊ घारे यांचे अनमोल कार्य “…….

” अंधारातून ….प्रकाशाकडे ” जाण्यासाठी ” सुधाकर भाऊ घारे ” सर्व शैक्षणिक खर्च करणार , ” निकिता ” ने मानले आभार…..! 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत मध्ये राहणारी ” निकिता विष्णू शेंडे ” या विद्यार्थिनीला शिक्षण घेत असताना अकाली अंध पण आले , मात्र शिक्षणाची आवड असलेल्या निकिताने धीर न सोडता आपले शिक्षण सुरू ठेवण्याची जिद्द ठेवली . MPSC हि महत्वाच्या अभ्यासक्रमात अभ्यास करताना ” टॅबलेट ” शिवाय तिचा अभ्यास होणे शक्य नव्हते , मात्र ते घेण्यास परिस्थिती नसल्याने अनेकांना सांगून मदत मिळत नव्हती .

          मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा राजिप चे माजी उपाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” यांच्या कानावर हि बाब गेल्यावर त्यांनी क्षणाचा विलंब न लावता या दृष्टीहीन विद्यार्थिनीला ” टॅबलेट ” अभ्यास करण्यास मदत भेट दिली व भविष्यात सर्व शिक्षणाचा खर्च उचलणार , अशी ग्वाही दिली.

          ” अंधाराकडून….प्रकाशाकडे ” नेणारी हि ” टॅबलेट ” निकिताने भेट मिळाल्यावर खूपच आनंदित झाली. अनेकांना आमच्याकडे बघितल्यावर दृष्टीहीन म्हणून हातात ” काठी ” देऊ करतात , मात्र सुधाकर काका यांनी दिलेली भेट भविष्यात ” सृष्टी ” बघण्यास खूपच उपयुक्त ठरणार असून ” शिक्षण हेच सर्वश्रेष्ठ ” अशी मनात जिद्द असल्याने ” MPSC ” परीक्षेचा अभ्यास करण्यास हे ” टॅबलेट ” खूपच महत्वाचे ” गाईड ” ठरणार असल्याचे भावनिक मत व्यक्त करून ” निकिता शेंडे ” हिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

          यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनीच निकिताच्या ” जिद्दीचे ” कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!