……” माझी जमीन माझा घाम – कर्जत खालापूर मतदार संघातील तरुणांना प्रथम काम , ” सुधाकर भाऊ घारे ” यांचा MIDC कंपनी व्यवस्थापनाला इशारा “…..
तरुणांसाठी खालापूर तालुक्यात " गणपती उत्सवापूर्वी " तीव्र आंदोलन छेडणार !

माझा जीव गेला तरी बेहत्तर , पण मागे हटणार नाही , ” गोदरेज व टाटा ” कंपनीला ” वठणीवर ” आणणार……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
खालापूर तालुक्यात खूप मोठी इंडस्ट्रीज असूनही येथे स्थानिक तरुण – तरुणींना काम मिळत नाही , कामावर घेतले तर त्यांना पर्मनंट करत नाहीत , शिवाय स्थानिक म्हणून त्यांना डावलून भरतीच केले जात नाही , यामुळे अनेकांना बाहेर मुंबई , नवी मुंबई , पुणे येथे कामाला जावे लागते , मात्र या जीवघेण्या प्रवासाने अनेकांचे ” अपघात ” होवून बळी गेले आहेत. या सर्व बाबींच्या आलेल्या तक्रारीवरून खालापूर तालुक्यातील ” टाटा स्टील व गोदरेज ” सारख्या तसेच इतर अनेक नामवंत कंपनीच्या व्यवस्थापनाला वठणीवर आणण्यासाठी २६ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व पक्षीय व सर्व संघटनेला आमंत्रित करून बैठक आयोजित केली आहे.
” श्री गणपती उत्सवा ” पूर्वी भव्य स्वरूपाचे तीव्र ” आंदोलन ” छेडण्यात येणार असून हे आंदोलन कुठल्या पक्षाशी निगडित नसून या मतदार संघात असलेल्या बेरोजगार तरुण तरुणीच्या भवितव्याशी निगडित असल्याने या आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा राजिप चे माजी उपाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” यांनी पत्रकार परिषदेत केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क कार्यालयात मंगळवार दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता झालेल्या या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे , राजिप चे सदस्य संतोष बैलमारे , प्रदेश उपाध्यक्ष तथा खोपोलीचे माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ पाटील , ॲड. निगुडकर , महिला तालुका अध्यक्षा ॲड. रंजना धुळे , नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे , युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील पालकर , खालापूर युवा अध्यक्ष कुमार दिसले ,माजी नगराध्यक्ष राजेश लाड , नगरसेवक अशोक दादा राऊत , जिल्हा संघटक पंकज पाटील , माजी उपनगराध्यक्ष उमेश आप्पा गायकवाड , मा. नगरसेवक सोमनाथ ठोंबरे , युवा नेता केतन बेलोसे , त्याचप्रमाणे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
माझ्या मतदार संघातील तरुण तरुणींना काम मिळत नाही , तोवर हे आंदोलन सुरू राहणार , माझा ” जीव ” गेला तरी चालेल , पण मागे हटणार नाही , टाटा स्टील , गोदरेज कंपनीमध्ये परप्रांतीय ठेकेदारामुळे परप्रांतीय यांना कामे , मात्र स्थानिकांना कामे मिळत नाहीत , पर्मनंट करत नाहीत , ” पाशिलकर ” नावाचा व्यवस्थापक आडमुठी धोरणाने वागत असून तो कुणाला जुमानत नाही , भेटत नाही , स्थानिक तरुणांना रोजगार देत नाही , म्हणून हा लढा उभारणार असून या लढ्यात सर्व पक्षाने सामील होऊन एकत्र येण्याची गरज असल्याचे मत सुधाकर भाऊ घारे यांनी व्यक्त केले. तर शासकीय गुरुचरण जागा देखील या कारखान्याने हडप केल्याचा आरोप याप्रसंगी सुधाकर भाऊ यांनी केला.

यावेळी परप्रांतीय ठेकेदारांची यादीच त्यांनी वाचून दाखवली , त्यामुळे सुधाकर भाऊ घारे यांनी पुकारलेला हा बेरोजगार तरुणाचा ” एल्गार ” खालापूर तालुक्यातील सर्वच कंपन्यांना ” भारी ” पडणार , असेच काहीसे चित्र दिसणार आहे.




