दिल्ली NCR

…..” कर्जत मध्ये Ola–Uber सेवा सुरू झालीच पाहिजे , भाजप युवा मोर्चा , कर्जत शहराध्यक्ष सर्वेश सुनील गोगटे यांची मागणी “…..

आधुनिक परिवहन सेवेचे , एक पाऊल पुढे !

“ सुविधा कर्जतकरांसाठी, संधी स्थानिकांसाठी आणि विकास कर्जतसाठी ” – सर्वेश गोगटे…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जतकरांच्या सुविधेसाठी — आधुनिक परिवहन सेवेकडे एक पाऊल म्हणजे कर्जत मध्ये ” Ola–Uber ” सेवा सुरू झालीच पाहिजे , अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा , कर्जत शहराध्यक्ष ” सर्वेश सुनील गोगटे ” यांनी केली आहे . 

           मुंबई एअरपोर्ट , मुंबई , पुणे तसेच इतर शहरांमध्ये प्रवास करताना कर्जतकरांना अनेकदा मोठे भाडे मोजावे लागते. परवडणारी, पारदर्शक आणि विश्वासार्ह टॅक्सी सेवा उपलब्ध होणे , ही आज कर्जतकरांची गरज बनली आहे. म्हणूनच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा – कर्जत ,कर्जतकरांच्या हितासाठी कर्जत शहरात ” Ola–Uber ” सारख्या आधुनिक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.

          मात्र, या प्रयत्नांमध्ये आमचे स्थानिक युवा वाहनधारक सहकारी बंधू यांचे नुकसान व्हावे, ही आमची कुठलीच भूमिका अजिबात नाही.आजचे युग स्पर्धेचे, तंत्रज्ञानाचे आणि बदल स्वीकारण्याचे आहे. स्थानिक वाहनधारकांनीही आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल बुकिंग आणि स्पर्धात्मक सेवा पद्धती स्वीकारून पुढे जावे, यासाठी त्यांनाही आवश्यक सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याचा आमचा प्रयत्न राहील , असे मत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा , कर्जत शहराध्यक्ष सर्वेश सुनील गोगटे यांनी व्यक्त केले असून ,” प्रवाशांना परवडणारी सुरक्षित सेवा , स्थानिक वाहनधारकांचे हित ,आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार तर कर्जतच्या विकासाला नवी दिशा ” असे आमचे ध्येय स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

           कर्जतकरांना उत्तम आणि परवडणारी परिवहन सेवा मिळावी, स्थानिक युवा वाहनधारकांना आधुनिक संधी मिळावी , याकरिता कर्जत आधुनिक विकासाच्या दिशेने पुढे जावे , “ सुविधा कर्जतकरांसाठी, संधी स्थानिकांसाठी आणि विकास कर्जतसाठी ” असे धोरण भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, कर्जत यांचे असल्याचे मत , सर्वेश सुनील गोगटे शहराध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, कर्जत यांनी मांडले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!