……” कर्जतमध्ये हुतात्मा ” नाग्या बाबा कातकरी ” व धरती आबा ” बिरसा मुंडा ” यांचे स्मारक होण्याची मागणी “…….

आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष ” सचिन भाई भालेराव ” यांनी दिले कर्जत नगर परिषदेस निवेदन……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुका हा ” आदिवासी ” बहुल भाग आहे. आदिवासी समाजाचा बालेकिल्ला असल्याने येथे या समाजाची भरपूर लोकसंख्या आहे. कर्जत नगर परिषदेच्या हद्दीमध्ये सुद्धा आदिवासी समाजाचे भरपूर अस्तित्व असून कर्जतच्या बाजारपेठा या संपूर्ण आदिवासी समाजावर अवलंबून आहेत. कर्जत शहरात सर्व समाजाच्या महापुरुषांचे स्मारक, कोपरा स्मारक नगर परिषदेच्या माध्यमातून उभारली गेली आहेत, परंतु आदिवासी समाजाचे महान क्रांतिकारक ” धरती आबा भगवान बिरसा मुंडा ” तसेच रायगड जिल्ह्यातील महान क्रांतिकारक ” हुतात्मा नाग्या बाबा कातकरी ” यांच्या विचारांकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. येथील लोकप्रतिनिधी देखील आदिवासी समाजाचा वापर फक्त मतांसाठी नगरपालिकेत निवडून येण्यासाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे. या थोर महापुरुषांचे ” स्मारक तसेच कोपरा गार्डन ” आपल्या माध्यमातून कर्जत शहरातील मध्यवर्ती भागात उभारण्यात यावे, व या महापुरुषांच्या कार्याचा सन्मान आपल्या माध्यमातून करण्यात यावा, असे निवेदन ” आझाद समाज पार्टीच्या ” माध्यमातून जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कर्जत नगर परिषदेला देण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यासहित कर्जत तालुका हा हुतात्मे व नवरत्नांची खान आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या ” हुतात्मा नाग्या बाबा कातकरी व धरती आबा बिरसा मुंडा ” यांच्या बलिदानाचा इतिहास सर्वांना समजावा , या उदात्त हेतूने ” आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन भाई भालेराव ” हे पुढे सरसावले असून त्यांचे स्मारक होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. म्हणूनच त्यांनी कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे, उपनगराध्यक्ष संतोष दादा पाटील व मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना हे निवेदन दिले असून , महापुरुषांच्या स्मारकांची पूर्तता न झाल्यास आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आदिवासी महापुरुषांच्या स्मारकासाठी आंदोलन उभे केले जाईल , असा इशाराही आजाद समाज पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष ” सचिन भाई भालेराव ” यांनी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
हे निवेदन देताना कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, नगराध्यक्ष पुष्पाताई दगडे, उपनगराध्यक्ष संतोष दादा पाटील, पाणी सभापती सुचिताताई खोत, बांधकाम सभापती महेंद्रजी चंदन, महिला व बालकल्याण सभापती हर्षाली गायकवाड, नगरसेविका सुमिता गायकवाड, नगरसेविका रूपाली पवार, नगरसेविका नेहा शिंदे, नगरसेविका मानसी कानिटकर, नगरसेवक अशोक दादा राऊत, माजी उपनगराध्यक्ष उमेश आप्पा गायकवाड , युवा नेते रोहित सरावते, सामाजिक कार्यकर्ते गणेश धनवटे, सामाजिक कार्यकर्ते अल्पेश मोरे व आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन भालेराव हे उपस्थित होते.




