दिल्ली NCR

…..” वंचित बहुजन आघाडीचे नेते – कुशल शेतकरी – उद्योजक ” दिवंगत हरिश्चंद्रजी यादव ” यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे फळवाटप कार्यक्रम “……

" दादांच्या " जयंती निमित्त सामाजिक उपक्रमाने त्यांच्या कार्याला " नतमस्तक व उजाळा !

दरवर्षी ” सामाजिक उपक्रमाने ” जयंती होणार साजरी – लोकेश यादव……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

वंचित बहुजन आघाडीचे नेते – कुशल शेतकरी – उद्योजक ” दिवंगत हरिश्चंद्रजी यादव ” यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे ” फळवाटपाचा ” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज सोमवार दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते ” दिवंगत हरिश्चंद्रजी यादव ” यांच्या बहुजन वर्गासाठी केलेल्या कार्याला ” नतमस्तक व उजाळा ” देण्यासाठी सदर कार्यक्रमाला वंचितचे कर्जत तालुक्यातील पदाधिकारी , कार्यकर्ते , कुटुंबातील सदस्य , नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

              या कार्यक्रमास कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दीपक अडकमोल सर , सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य प्रवक्ते ॲड. कैलास मोरे , वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा महासचिव धर्मेंद्र दादा मोरे , रायगड जिल्हा संघटक सुनील आप्पा गायकवाड , तालुकाध्यक्ष प्रदीप ढोले , तालुका उपाध्यक्ष आनंद खैरे , तालुका सचिव शैलेश खोब्रागडे , भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड , रायगड जिल्हा उपाध्यक्ष अनंता गायकवाड , संस्कार उपाध्यक्ष उल्हास जाधव , पत्रकार संजय अभंगे , दिनेश लवंडे ,शरद गायकवाड , सुनील मोरे , अनिकेत गायकवाड , कमलाकर जाधव , सुनील वाघमारे , सुरेश कांबळे , दिपक जाधव , बाळाराम गवळे , नितीन गायकवाड , मारुती शिंदे , सौ. वर्षा खोब्रागडे , रेल्वेचे सुनील चव्हाण , आदी मान्यवर उपस्थित होते.

         तर त्यांचा मुलगा लोकेश हरिश्चंद्र यादव , प्रणेश हरिश्चंद्र यादव , मुलगी व जावई आम्रपाली रुपेश सोनावणे , आदी वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते , कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         या सर्वांच्या उपस्थितीत मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. दिवंगत हरिश्चंद्र यादव यांच्या कार्याचे स्मरण याप्रसंगी करण्यात आले. दरवर्षी ते हयात असताना या ज्येष्ठ नेत्याचा , सर्वांच्या दादांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा होत असताना आता त्यांची जयंती दरवर्षी अशीच आपण समाजाचे काही देणे आहोत , हि जाणीव ठेवून विविध उपक्रम राबविले जातील , असे भावनिक मत त्यांचा मुलगा ” लोकेश हरिश्चंद्र यादव ” यांनी सर्व वंचित चे पदाधिकारी , कुटुंबाच्या वतीने व्यक्त केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!