टॉप न्यूज़

…..” राज्य सरकारची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ “….

ऐतिहासिक कर्जमाफीद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनात नवी आशा !

कर्जमुक्तीचा लाभ घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास आमचे जनसेवा कार्यालय येथे भेट द्या – सुनील गोगटे 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

महाराष्ट्राचे लाडके ” मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब ” यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ” राबविली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहे. या कर्जमुक्तीचा लाभ घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास चिंता करू नका. आपल्या सेवेसाठी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ” सुनील गोगटे ” यांचे जनसेवा कार्यालय सदैव तत्पर आहे , अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी दिली आहे . 

             या योजनेअंतर्गत कर्जत तालुक्यातील सुमारे १,९९० शेतकऱ्यांना विविध बँकांमार्फत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, शेतकरी बांधवांच्या वतीने शेतकऱ्यांचा कैवारी तथा राज्याचे मुख्यमंत्री ” देवा भाऊ ” तथा मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महायुती सरकारचे त्यांनी मनःपूर्वक त्रिवार आभार व्यक्त केले आहेत .

      म्हणूनच या अनमोल योजनेच्या कर्जमुक्तीचा लाभ घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास चिंता करू नका. आपल्या सेवेसाठी सुनील गोगटे जनसेवा कार्यालय सदैव तत्पर आहे. शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन, कागदपत्रांची माहिती आणि सर्वतोपरी सहकार्य विनामूल्य करण्यात येईल, जेणेकरून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा लाभ मिळेल. 

        यासाठी संपर्क – किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे जनसेवा कार्यालय , विठ्ठल नगर, कर्जत , कार्यालयीन वेळ – सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.००. 

मोबाईल क्रमांक – 9320250278

” शेतकऱ्यांच्या हितासाठी… शेतकऱ्यांच्या सेवेसाठी… आपण सदैव आपल्या सोबत! ” असे मत सुनील गोगटे यांनी व्यक्त केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!