……” ॲड . सौ.पूजा सुर्वे , सामाजिक – राजकीय – शैक्षणिक – धार्मिक – सांस्कृतिक – कला – क्रीडा क्षेत्रातील लखलखनारा तारा “…..
" मां साहेब जिजाऊंचा , सावित्रीबाई फुलेंचा " वारसा घेऊन गरीब - गरजू महिलांचा हक्काचा आधार !

राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत विधानसभा अध्यक्षा ” ॲड . सौ.पूजा सुर्वे ” यांचे अष्टपैलू कार्य,……कालपण…..आजपण….आणि उद्यापण ….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
” राजमाता जिजाऊ , माता सावित्रीबाई ” यांची शिकवण पुढे नेवून ” एक स्त्री शिकली तर संपुर्ण कुटुंब सुधारते ” , यासाठी महिलांना शिक्षणाचे महत्त्व व त्यांच्या सक्षमीकरणासाठी आपणही आधाराचा हात पुढे करून या समाजाचे देणे आहोत , ही विचारधारा मनात अंगीकारून ” जिजाऊंची लेक ” बनून महिलांना ” आर्थिक ” मजबुती प्रवाहाकडे आणण्यास अहोरात्र प्रयत्न करण्याचा मानस ” राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या ” संस्थापक अध्यक्षा ॲड . सौ.पूजा सुर्वे यांचे असल्याने त्यांचे कार्य गरीब गरजू महिलांसाठी हक्काचा ” आधार ” म्हणावा लागेल . 
संघर्षमय जीवनातून ” उत्तुंग गरुड भरारी ” घेऊन आकाशाला गवसणी घालण्याजोगे त्यांचे प्रयत्न खरोखरच आजच्या महिलांना एक आदर्श ठरेल . कॉलेज जीवनापासून सौ.पूजा सुर्वे महापुरुषांचे विचाराने प्रेरित होऊन ” रणरागिणी ” सारख्याच वागत . ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी प्रायव्हेट क्लासेस सुरू केले , क्लासेस घेत असतानाच त्यांनी उल्हासनगर येथे भारतीय हिंदी हायस्कूल मध्ये ” कॉम्प्युटर टीचर ” म्हणून नोकरी सुरू केली . एल आय सी मध्ये परीक्षा देऊन त्या एजंट झाल्या , मात्र समाजसेवेचे व्रत घेतल्याने त्यांचे कुठेच मन रमत नव्हते म्हणून थोडी आर्थिक बाजू चांगली झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी सामाजिक कार्यात उतरून ” महिलांच्या उन्नतीसाठी ” कार्य करण्यास सक्षम पाऊल उचलले . 
त्यांनी ६ जून २०१८ रोजी ” छत्रपती शिवाजी महाराजांच्या ” राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत ” राजमाता जिजाऊ फाउंडेशनची ” स्थापना केली आणि या फाउंडेशनच्या मार्फत त्या झपाट्याने कामाला लागल्या . स्थापनेच्या दिवशीच मोफत दाखले वाटप शिबीराचे आयोजन केले . उत्पन्नाचे दाखले , पॅन कार्ड , आधार कार्ड ,जातीचे दाखले , रेशन कार्ड , डोमेसाईल इत्यादी विविध ५०० पेक्षा जास्त नागरिकांना व अशिक्षित महिलांना सर्व प्रकारचे दाखल्यांचे वाटप पळसदरी – कर्जत येथे केले . त्यानंतर २६ जून रोजी ” छत्रपती शाहू महाराज ” जयंतीनिमित्त पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेतला , त्यात जवळजवळ साडेचारशे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केलं . ३० जुलै रोजी सर्व शाळांमध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केल्या . असे कार्यक्रम सातत्याने दरवर्षी होत असताना गणेशोत्सवासाठी आरतीच्या पुस्तकांचे वाटप केले , त्यानंतर निराधार – अपंग – विधवा महिलांना संस्थेमार्फत पेन्शन योजना राबविली . पळसदरी ग्रामपंचायत मधील बेरोजगारांची नोंदणी ” जिजाऊ फाउंडेशन ” मार्फत करण्यात आली . फाउंडेशन मार्फत तीस महिला बचत गटांची स्थापना करून त्यांना कर्ज देऊन महिला सबलीकरण व आर्थिक मजबुतीसाठी प्रयत्न केले. हे त्यांचे कार्य तालुक्यात कौतुकास्पद ठरले . ८ मार्च ” जागतिक महिला दिना ” निमित्त विरंगुळा म्हणून एन डी स्टुडिओ बघण्यासाठी सर्व महिलांना घेऊन गेले. तसेच कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून स्वताच्या पायावर उभे राहण्यास सक्षम केले . थोर समाज सेविका ” सिंधुताई सपकाळ ” यांचा जाहीर कार्यक्रम घेऊन त्यांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाने महिलांना भविष्यातील घडामोडीत त्याचा फायदा झाला . पळसदरी ठाकुरवाडी शाळेत मुलांना खेळाचे साहित्य तसेच पूरग्रस्तांसाठी बिस्किट वाटप केले, गोरगरिबांसाठी आरोग्य शिबीर घेतले व दरवर्षी कौटुंबिक जीवनातुन मन मोकळे होण्यासाठी व महिलांची हिंमत वाढविण्यासाठी ” गड किल्ल्यांवर ” सहल घेवून जातात , जेणेकरून त्यांना ” छत्रपतींची ” प्रेरणा मिळावी. पर्यावरणाचे संरक्षण व्हावे , म्हणून अनेक ठिकाणी त्यांनी वृक्षारोपण कार्यक्रम केले आहेत .
कोरोना महामारीच्या काळात आदिवासी महिलांना अन्न धान्य व इतर सामानाचे वाटप केले. शिवजयंतीच्या निमित्ताने निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन त्या करतात , त्यात ५५० विद्यार्थ्यांनी , तरुणींनी , महिलांनी भाग घेतला , ” छत्रपतींची प्रेरणा ” या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना दिली . असे एक ना – अनेक प्रकारे जिजाऊ फाऊंडेशन मार्फत ॲड. पूजा सुर्वे या गोरगरीब आदिवासी महिला , नागरिकांसाठी दरवर्षी अनेक उपक्रम राबवतात .” आपले सरकार ” हे कार्यालय उघडून गरीब – गरजू – अशिक्षित महिलांना सर्व प्रकारचे दाखले काढण्यास मदत करतात . 
महिलांच्या न्याय हक्कासाठी स्वतः ” वकील ” होऊन कायद्याच्या लढाईत त्यांची बाजू लढण्यासाठी महिला सक्षमीकरणात एक पाऊल पुढे टाकून या ” आधुनिक आणि तंत्रज्ञान ” युगात महिलांच्या ” मुकुटमणी ” झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे . त्यांची महिलांसाठी असलेली तळमळ खरचं वाखाणण्याजोगी असून ” राजमाता जिजाऊं फाउंडेशनच्या ” माध्यमातून व राजकीय क्षेत्रात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार पक्षाच्या त्या कर्जत खालापूर मतदार संघाच्या अध्यक्षा म्हणून चांगले कार्य करत आहेत . कर्जत नगर परिषद , पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशात त्यांचा देखील अतिशय महत्वाचा वाटा आहे . कुटुंबातील जबाबदारी पार पाडून आपल्या आयुष्यातील ” सुवर्ण क्षण ” महिलांच्या उन्नतीसाठी ” कालपण – आजपण – आणि उद्यापण ” खर्च करून सक्षम कार्य करणाऱ्या ॲड . सौ.पूजा सुर्वे यांच्या या ” अनमोल कार्यास ” त्यांचे पती उद्योजक ” प्रताप सुर्वे ” व मुलांची तसेच कुटुंबातील सदस्यांची नेहमीच साथ असते . त्यांच्या आजच्या २५ जून २०२६ या ” जन्म दिनानिमित्त ” मानाचा मुजरा ! व खूप खूप शुभेच्छा…..!





