दिल्ली NCR

……” साधी रहाणी – उच्च विचारसरणी , राष्ट्रवादीत ” संघटन कौशल्यात ” तरबेज , सर्वसामान्यांचं नेतृत्व मधुकर भाऊ घारे !

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यातील वासऱ्या च्या खोंड्यात खांडपे ग्रामपंचायतीचे ” उपसरपंच ” पद भूषवून परिसराचा विकास कामांच्या जोरावर चेहरा मोहरा बदलणारे ” मधुकर भाऊ परशुराम घारे ” सर्वांना हवेहवेसे शांत स्वभावाचे नेतृत्व म्हणावे लागेल. साधी रहाणी , संघटन कौशल्य , तर नेतृत्व गुण त्यांच्या अंगी असल्याने तरुणांच्या नेहमीच गराड्यात रहाणारे मधुकर भाऊ सदैव प्रत्येक कार्यात अग्रेसर असतात . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाढत चाललेली ” ताकद ” यांत त्यांचा नक्कीच खारीचा वाटा म्हणावा लागेल . 

         कमी बोलण , पण कार्यात आपली प्रतिमा दाखविणारे मधुकर भाऊ आपले वडील ” परशुराम आप्पा घारे ” यांच्याकडूनच सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा घेऊन कार्यरत आहेत. आप्पांच्या ” मुशीत ” वाढलेले मधुकर भाऊ मुत्सद्दी राजकारणी आहेत. त्यांचा जादा भर हा सामाजिक कार्यात असतो . तरुणांना ” रोजगाराची ” अनेक संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे . गरजवंतांना ” त्यांचा मदतीचा हात ” नेहमीच असल्याने वासराच्या खोंड्यात त्यांचे नाव सर्वजण ” आदराने ” घेतात .

         कर्जत मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते , जिल्हाध्यक्ष तथा राजिप चे मा. उपाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” यांचे ते मोठे बंधू असून त्यांच्या राजकीय कार्यकिर्दीस त्यांचा खूपच मोठा हातभार पहाण्यास मिळत आहे . अनेक राजकीय पदे त्यांनी या मतदार संघात भोगली असून राष्ट्रवादी कर्जत तालुका उपाध्यक्ष , कब्बडी असो. चे अध्यक्ष , क्रिकेट संघाचे अध्यक्ष , तिरुपती बालाजी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष , श्री सोमजाई माता देवस्थान कमिटी , सकल मराठा संघाचे संघटक , अशा विविध क्षेत्रात त्यांच्या कार्याचा आलेख खूपच ” जमेचा ” आहे . ते धार्मिक वृत्तीचे असल्याने वारकरी संप्रदाय , बैठक , श्री गणेश भक्त , श्री तिरुपती बालाजी मित्र मंडळ अश्या विविध धार्मिक क्षेत्रात ते काम करत आहेत. दरवर्षी दर्शनासाठी हजारो भाविक भक्तांना घेऊन ते वारी व त्यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने ” तिरुपती बालाजी ” चे दर्शन करत असतात . 

         अश्या या सामाजिक – राजकीय – धार्मिक – शैक्षणिक – सांस्कृतिक – क्षेत्रात अव्वल काम करणारे , मातीतील खेळांना प्राधान्य देऊन कब्बडी , क्रिकेट , खेळाडूना उत्तेजीत व उत्साह दाखवून त्यांना अव्वल बनविण्यात त्यांचा हातभार असल्याने या ” नेतृत्व गुण नेत्यास ” भावी काळात सर्वांची सेवा करण्यास त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण होवो , अशी भगवंत चरणी प्रार्थना करून त्यांच्या आजच्या गुरुवार दिनांक ०६ ऑगस्ट २०२६ या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा रुपी सदिच्छा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!