टॉप न्यूज़

……” चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका ” सौ. जान्हवी सुदेश देवघरे ” यांचा एक छोटासा प्रयत्न “….…

” चिमुकल्यांचे हसू आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य ” हेच आपल्या कामाचे खरे समाधान…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

आजच्या युगात ” शिक्षण ” हे खूपच महत्वाचं झालं आहे. चिमुकल्या वयातच शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी वातावरण देखील आनंदी असणे काळाची गरज आहे. आपल्या प्रभाग क्रमांक ९ मधील अंगणवाडी शाळेची दुरावस्था पाहून एका ” माऊलीचे ” काळीज चर…र झाले. या ” चिमुकल्यांना ” देखील छान वातावरणात शिक्षणाचे ” बाळ धडे ” घेता यावे , म्हणून शिवसेनेच्या नगरसेविका ” सौ. जान्हवी सुदेश देवघरे ” यांचा एक छोटासा प्रयत्न शिक्षणासाठी खूपच अभिमानास्पद कार्य म्हणावे लागेल. 

          कर्जत नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ९ , आमराई – कर्जत येथील ” एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी क्र. ३, आमराई येथे गेल्या ३ ते ४ वर्षांपासून शाळेत विद्युत मीटर नसल्यामुळे विजेअभावी उन्हाळ्याच्या दिवसांत चिमुकल्या विद्यार्थ्यांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या अंगणवाडी सेविका सौ. चारुशीला देशमुख व श्री. अविनाश भिंगारे यांनी नगरसेविका जान्हवी देवघरे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून तातडीने विद्युत मीटर बसवण्याचे काम पूर्ण करून घेण्यात आले. तसेच Caring Friends, Mumbai यांच्या मदतीने चिमुकल्यांना डिजिटल माध्यमातून शिक्षण घेता यावे, यासाठी टीव्हीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. शिवाय अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीसाठी पंखा, लाईट, तसेच रंगकाम आवश्यक असल्याचे सांगितले. ही बाब लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न करता शिवसेनेच्या कर्तबगार नगरसेविका सौ. जान्हवी देवघरे यांनी ८ ते १५ दिवसांत अंगणवाडीतील आवश्यक सर्व कामे पूर्ण करून घेण्याचे आश्वासन दिले आहे.

           ज्या ठिकाणाहून ही ” चिमुकली मुले ” आपल्या आयुष्याची पहिली पायरी चढतात, त्यांच्या शिक्षणासाठी आणि सुविधांसाठी काहीतरी करण्याची संधी मला मिळाली, याचा मनापासून आनंद आहे. आज याच निमित्ताने अंगणवाडीमध्ये माझा केलेला सत्कार हा माझ्यासाठी केवळ सत्कार नसून चिमुकल्यांसाठी काम करण्याची आणखी मोठी ” जबाबदारी आणि प्रेरणा ” आहे. खरंतर आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप ” भाग्याचा आणि समाधानाचा ” आहे , असे भावनिक मत आमराई अंगणवाडी शाळेत आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक ९ दहिवली – आमराई च्या नगरसेविका सौ. जान्हवी सुदेश देवघरे यांनी व्यक्त केले.

           या प्रेमासाठी आणि विश्वासासाठी अंगणवाडी सेविका सौ. चारुशीला ताई देशमुख, श्री. अविनाश भिंगारे तसेच रोशन दादा परखंडे, पूजाताई उतेकर अंगणवाडीतील शिक्षक व इतर पालक व तेथील रहिवासी यांचे मनःपूर्वक आभार शिवसेनेच्या नगरसेविका सौ. जान्हवी सुदेश देवघरे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे युवा नेतृत्व सुदेश देवघरे हे सुद्धा होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!