…..” कर्जतमध्ये ” एस एस मोबाईल शॉपीच्या ” धमाकेदार ऑफर मुळे ग्राहकांची तुफानी गर्दी “……

आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या हस्ते झाले उद्घाटन !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
राज्यात ४५० हून अधिक शाखा असलेल्या ” एस एस मोबाईल शॉपीचे ” आज कर्जत शहरात महावीर पेठेत शानदार उद्घाटन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. आज उद्घाटन दिनी मोबाईल व टिव्ही खरेदीवर अनेक ऑफर , डिस्काउंट , वॉरंटी , फीडबॅक , तर प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू कमी किमतीत देण्यात येणार आहेत. शिवाय लकी ड्रॉ वर भाग्यवान विजेत्याला इलेक्ट्रिक स्कूटर बक्षीस मिळणार असल्याने कर्जतमध्ये या ” एस एस मोबाईल शॉपीच्या ” ठिकाणी ग्राहकांची खरेदी करण्यास तुफान गर्दी पहाण्यास मिळत आहे.

आज रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या ” एस एस मोबाईल शॉपीचे ” शानदार व दिमाखदार खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या उत्तुंग गर्दीत भव्य उद्घाटन कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या हस्ते करण्यात आले. देशमुख व सोनावणे परिवार यांच्या माध्यमातून हे एस एस मोबाईल शॉपी कर्जतमध्ये सुरू केली असून आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी मराठी माणूस अशा व्यवसायात येत असल्याने अभिमानाची बाब असून त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या सर्व ऑफर आजच्या दिवशीच असल्याने आजच या एस एस मोबाईल शॉपी ला भेट द्या , असे आवाहन व निमंत्रण देशमुख व सोनावणे परिवाराने केले आहे.




