……” पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि संघटनात्मक वाटचालीसाठी व्हॉईस ऑफ मीडियाची राज्यात गरुड झेप “……
छत्रपतींच्या कर्मभूमीत " खोपोली " येथे कोकण विभागाचा " प्रशिक्षण शिबिर " संपन्न !

पत्रकारांच्या कुटुंबासाठी शिक्षण – आरोग्य – घर – विमा , पेंशन व इतर बाबींसाठी लक्षवेधी घोषणा…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
आजच्या ” आधुनिक आणि तंत्रज्ञान ” युगात पत्रकारिता क्षेत्रात प्रिंट मिडिया , इलेक्ट्रॉनिक मिडिया व डिजिटल मिडीयात प्रवेश करताना भविष्यात आपण यांत तग धरू शकतो का ? आपला उदरनिर्वाह , कुटुंबाचे भविष्य , शिक्षण , आरोग्य हे देवू शकू का ? याचा गांभीर्याने विचार करूनच आजच्या तरुण पिढीने पत्रकार व्हावे , असे अनमोल विचार ” व्हॉईस ऑफ मिडिया ” या देशातील तसेच राज्यात ” १ नंबर ” असलेल्या पत्रकारांच्या संघटनेचे कार्यतत्पर प्रदेश अध्यक्ष ” विजय चोरडिया ” यांनी खोपोली येथे व्हॉईस ऑफ मिडिया कोकण विभागीय प्रशिक्षण शिबिर व पत्रकारांसाठी भविष्यातील नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक ०९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत रिशीवन हॉटेल, साजगाव रोड, येथे केले होते , त्यावेळी ते बोलत होते.

गेली अनेक वर्षे ” व्हॉईस ऑफ मिडिया ” चे आंतरराष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ” संदिप काळे साहेब ” यांच्या नेतृत्वाखाली तर प्रदेश अध्यक्ष ” विजय चोरडिया ” यांच्या मार्गदर्शनाखाली ” पत्रकार बांधवांच्या हक्कांसाठी, पत्रकारितेच्या सन्मानासाठी आणि संघटनात्मक एकजुटीसाठी ” संघटना कार्यरत आहे. पत्रकारितेच्या बदलत्या प्रवाहात पत्रकारांची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करणे, पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी सामूहिक लढ्याची दिशा निश्चित करणे, संघटनात्मक बांधणीला गती देणे तसेच पत्रकारिता क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सखोल मार्गदर्शन व संवाद ते महाराष्ट्रभर साधत असतात.
नवनवीन संकल्प करून आज ” व्हॉईस ऑफ मिडिया ” हि संघटना पत्रकारांचे व त्यांच्या कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्नशील असून सर्व संघटनांत व्हॉईस ऑफ मिडिया ” अव्वल ” ठरून गरुड भरारी घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

यावेळी विचार पिठावर व्हॉईस ऑफ मिडियाचे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया , मुख्य मार्गदर्शक अजित चव्हाण – ज्येष्ठ पत्रकार तथा प्रवक्ता भाजपा , प्रमुख मान्यवर मा. कुलदीपक शेंडे – नगराध्यक्ष खोपोली नगरपरिषद , मा. पंकज पाटील – मुख्याधिकारी खोपोली नगर परिषद , नगरसेविका सौ. वर्षा मोरे – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष , रश्मी मारवाडी (सर्व विंग प्रमुख) , महिला विंग प्रदेशाध्यक्षा – मा. वैशाली पाटील , कुमार कडलग (प्रदेश समन्वयक तथा विभागीय अध्यक्ष, कोकण विभाग) , अभिजीत दरेकर (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष) , संकेत घेवारे (महाराष्ट्र राज्य संयोजक ) , राजशेखर परब – उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष , रघुनाथ कडू – दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष , त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग , रत्नागिरी , ठाणे , पालघर , भिवंडी येथील जिल्हाध्यक्ष व कमिटी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांच्या कुटुंबातील पाल्यांना व गरजू विद्यार्थ्यांना तसेच इतर पालकांना देखील शालेय किट त्यात वह्या , नोट बुक , बॅग , पेन व इतर साहित्य व गिफ्ट वाटप करण्यात आले. तसेच व्हॉईस ऑफ मिडिया ची पुरवणी पत्रिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भविष्यात पत्रकारांच्या व गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण कॉलेज मध्ये मदत , आरोग्य , घर , विमा यांसारख्या गरजेला त्यांच्या पाठीशी व्हॉईस ऑफ मिडिया ठाम असल्याचे आश्वासन याप्रसंगी प्रदेश पदाधिकारी यांनी दिले. म्हणूनच पत्रकारांच्या गरजांचा विचार करणारी संघटना म्हणून व्हॉईस ऑफ मिडिया देशात ” अव्वल ” आहे. भविष्यात मुंबईत पत्रकार भवन , पत्रकारांचे महामंडळ , याची जोरदार मागणी करणार असल्याचे प्रदेश अध्यक्ष विजय चोरडिया यांनी सांगितले.

तर भाजप सरकार मधील पत्रकारांचे प्रश्न मांडणारे प्रवक्ते पत्रकार अजित चव्हाण यांनी संघटनेचे प्रश्न , मागण्या येणाऱ्या अधिवेशनात मांडल्या जाणार असल्याने आपण त्या सांगाव्यात , असे आवाहन केले. पत्रकार बांधवांचे प्रश्न , समस्या पत्रकारांनीच सोडवाव्या , यासाठी शासन दरबारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडून त्या सोडविण्याचा नक्कीच प्रयत्न करेन , असे आश्वासन प्रवक्ता अजित चव्हाण यांनी दिले. तर पत्रकारांचे संघटन बांधण्यावर भर देऊन ” व्हॉईस ऑफ मिडिया ” अधिक मजबूत करा , असे आवाहन वैशाली पाटील – प्रदेशाध्यक्ष महिला विंग यांनी केले. तर आज पर्यंतचा व्हॉईस ऑफ मिडिया चा प्रवास , त्याचे कार्य व भविष्यातील नियोजन कसे असेल , व पत्रकारांनी संघटनेसाठी काय करावे , याचे मार्गदर्शन मुख्य विंग प्रमुख रश्मी मारवाडी यांनी केले. याप्रसंगी खोपोली नगर पालिकेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी देखील पत्रकारांच्या भविष्यातील घडामोडी सांगून मार्गदर्शन केले.

याप्रसंगी व्हॉईस ऑफ मिडिया चे दिपक जगताप – खालापूर ता. अध्यक्ष , सुभाष सोनावणे – कर्जत ता. अध्यक्ष , प्रशांत खराडे – कर्जत ता. कार्याध्यक्ष , सदस्य – मंगेश म्हसे , खालापूर उपाध्यक्ष – सुधीर देशमुख , खोपोली शहराध्यक्ष – किशोर साळुंखे , सचिन यादव- रायगड जिल्हा महासचिव , शिवाजी जाधव – खालापूर तालुका संघटक , शिवाजी चोरगे, विलास पाटील, प्रवीण कोल्हे, जतीन मोरे, संतोष शेवाळे, हनुमंत मोरे, संतोष मोरे, गणेश मोरे , गणेश लोट , यांच्यासह बाबू पोटे व व्हॉईस ऑफ मिडिया चे अनेक पत्रकार उपस्थित होते.




