……” कर्जत रेल्वेचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिर संपन्न !
अध्यक्ष " महेश भोसले " यांचा पुढाकार !

” समर्पण रक्तकेंद्र , घाटकोपर व महा रक्तवीर राजाभाऊ कोठारी सर ” यांचे सहकार्य……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
” कर्जत रेल्वेचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे , कर्जत १ नंबर स्थानकाजवळ विराजमान असलेला मानाच्या बाप्पाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात . यावर्षी अध्यक्ष ” महेश भोसले ” यांच्या पुढाकाराने मंडळाने देशव्यापी ” रक्तदान शिबिराचे ” आयोजन करण्यात आले होते. समर्पण रक्तकेंद्र केंद्र घाटकोपर व महा रक्तवीर राजाभाऊ कोठारी सर यांचे सहकार्य या रक्तदान शिबिरास लाभले.

कर्जत – खालापुर तालुक्यातील ५४७ वे ” भव्य रक्तदान शिबीर ” बुधवार दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत कर्जत रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म नंबर १, NRMU कामगार भवन , कर्जत-रायगड येथे आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात एकूण २७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन राष्ट्रीय, सामाजिक व मानवतावादी कार्य केले.

याप्रसंगी रक्त संकलनाचे काम घाटकोपर येथील समर्पण रक्तकेंद्राचे डॉ.रमेश सिंग, सिस्टर शिला वाघमारे , सिस्टर आर्या , टेक्निशियन शोभा मॅडम, श्रीराम नाईक, सुनिल निले, दिपेश सरदार, विकास भालेराव व इतर आरोग्य सेवकांनी उत्तम पद्धतीने केले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार रायगड भूषण विजय मांडे , प्रभाकर करंजकर , सयाजी गायकवाड , जयवंत म्हसे , डॉ. प्रशांत सदावर्ते , आमिर मणियार, पत्रकार सुभाष सोनावणे , प्रशांत खराडे इत्यादी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी कर्जत रेल्वेचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष महेश उर्फ पप्पू शेठ भोसले , उपाध्यक्ष – प्रदीप पेटकर , सचिव – मनिष बॅनर्जी, खजिनदार – उमेश देशमुख व सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.
या देशव्यापी रक्तदान शिबिरात सहभाग घेणाऱ्या सर्वांचे आभार अध्यक्ष महेश भोसले व सर्व पदाधिकारी , रेल्वेचा राजा गणेशोत्सव मंडळ, कर्जत व राजाभाऊ कोठारी सर – ” रायगड भूषण , महारक्तवीर , नगरसेवक यांनी व्यक्त केले. आपण हि या देशव्यापी रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन व रक्तदान शिबिराचे आयोजन करून सहकार्य करावे , असे आवाहन याप्रसंगी ” रक्तदाते राजाभाऊ कोठारी सर ” यांनी केले.



