…..” शनी मंदिर परिसरातील नागरिकांच्या तक्रारींवर नगरसेवक ॲड .रोहित राजेंद्र ओसवाल यांची तातडीने कार्यवाही “…….

” परिसर केला चकाचक “… ……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषद हद्दीतील उल्हास नदी शेजारील शनी मंदिर परिसरातील गार्डनजवळ साचलेला चिखल आज साफ सफाई करून चकाचक करण्यात आला. या परिसरातील आलेल्या नागरिकांच्या तक्रारीवर ” नगरसेवक ॲड रोहित ओसवाल ” यांनी कार्यवाही करून काम केले . सदर ठिकाणाची लेव्हलिंग करून परिसर व्यवस्थित करण्यात येणार आहे.


या चिखलामुळे ” इसूब शाह बाबांचा दर्ग्याकडे ” जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच शनी मंदिर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना व ये-जा करणाऱ्या रहिवाशांनाही चालताना मोठी अडचण होत होती.

सदर तक्रार आरोग्य अधिकारी रायन सर यांना कळविल्यानंतर तातडीने दखल घेऊन काम सुरू करण्यात आले.

तसेच शनी मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयातील सर्व बाथरूममध्ये नवीन लाईट लावण्यात आली असून, नवीन नळदेखील बसविण्यात आले आहेत.

नागरिकांच्या समस्यांची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष काम करून घेतल्याबद्दल आरोग्य अधिकारी रायन सर , नीकेश फाळे व संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार ॲड. रोहित राजेंद्र ओसवाल – नगरसेवक, कर्जत यांनी व्यक्त केले.





