…..” गुंडगे प्रभागातील नागरिक व कर्जत पूर्वेकडील रेल्वे प्रवाशांना जाण्या येण्यासाठी रस्ता खुला – सुस्थितीत – सुरक्षित करा , आर पी आय कर्जत शहर महिला आघाडी प्रमुख ” सौ. वैशाली महेश भोसले ” यांची मागणी “……
कर्जत रेल्वे " स्टेशन मास्तर व इतर संबंधित अधिकाऱ्यांना " दिले निवेदन !

महिलांची सुरक्षा उपाय योजना करा , अन्यथा तीव्र ” क्रोध आंदोलनाचा ” इशारा…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत रेल्वे प्रशासन नेहमीच पूर्वेकडील असलेल्या भागाकडे ” सावत्रपणाची ” वागणूक या भागाकडून येणाऱ्या व जाणाऱ्या तसेच गुंडगे प्रभागात रहाणाऱ्या ग्रामस्थांना देऊन येथील सोई सुविधा तसेच महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. या गंभीर समस्येची जाणीव करून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) या पक्षाच्या कर्जत शहर महिला आघाडी प्रमुख ” सौ. वैशाली महेश भोसले ” यांनी रेल्वे प्रशासनाला याचा जाब विचारत अनेक समस्या सोडविण्याबाबत आज सोमवार दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी निवेदन देऊन महिलांची या परिसरातून जाताना सुरक्षिततेची ” हमी न दिल्यास व उपाय योजना न केल्यास ” रेल्वे प्रशासनाच्या या गलथान कारभारा विरोधात ” क्रोध आंदोलन ” करण्याचा इशारा दिला आहे.

कर्जत रेल्वे स्थानक हे मुंबई – पुणे वाहतुकीचे मध्य स्टेशन आहे. राज्यात नावाजलेल्या या स्थानकाची अवस्था खूपच ” गंभीर व जुनाट ” रेल्वे स्थानकासारखी अवस्था झाली आहे. या स्थानकाच्या पूर्वेकडील प्रवाशांना जाण्या येण्यासाठी रस्ता असून नसल्यासारखा असल्याचे दारुण सत्य दिसत आहे. या बाजूला जाण्या येण्यासाठी सुस्थितीत रस्ता नाही जिन्या वरून उतरल्यावर डावीकडे जाणारा रस्ता हा खाच खळग्याचा आहे , तर उजवी कडून बाहेर पडणारा रस्त्यावर संरक्षित भिंत नाही , व रस्ता देखील कुठून कुठे बाहेर पडतो , हेच समजत नाही , त्यामुळे महिलांनी अंधारातून मार्ग कसा काढायचा ? अशी गंभीर समस्या व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने हा रस्ता त्वरित सुस्थितीत व खुला करून देण्याबाबत ” आर पी आय कर्जत शहर महिला प्रमुख वैशाली भोसले ” यांनी सांगितले आहे.

कर्जत पूर्वे कडील रेल्वे प्रवाश्यांना व गुंडगे प्रभागातील नागरिकांना जाण्या येण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने हा रस्ता १० फूट रुंद पादचारी पुला पासून कर्जत नगर परिषदेच्या मुख्य रस्त्या पर्यंत असावा जो रेल्वे प्रशासनाने वाहन पार्किंग ला दिलेला आहे , तो सुस्थितीत व खुला करण्यात यावा. हा रस्ता पादचारी पुला पासून मुख्य रस्त्या पर्यंत सीमेंट – काँक्रिटचा बनवण्यात यावा ,
महिलांच्या सुरक्षेकडे पाहता तिथे पादचारी पुला पासून – मुख्य रस्त्या पर्यंत रोड लाइट बसवण्यात यावेत , प्रवाशांची सुरक्षा पाहता रेल्वे ट्रॅक साइड ला returning wall/ fencing बांधण्यात यावी , अशी मागणी त्यांनी केली असून ही कामे ” दुर्लक्षित व आपले कर्तव्यात कसूर ” करून आजपर्यंत केली नसल्याने त्वरीत रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन केली नाहीत तर आपल्या या ” बेजबाबदार कारभाराच्या ” विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कर्जत शहर महिला आघाडी च्या वतीने तीव्र व क्रोध आंदोलन करण्यात येईल , असा निर्वाणीचा इशारा आर पी आय कर्जत शहर महिला आघाडी प्रमुख ” सौ वैशाली महेश भोसले ” यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

यावेळी या गंभीर समस्येचे निवेदन कर्जत रेल्वे स्टेशन प्रबंधक , प्रभारी RPF निरीक्षक – कर्जत मध्य रेल्वे , प्रभारी GRPF निरीक्षक , वरिष्ठ अनुभाग अभियंता कार्य. कर्जत मध्य रेल्वे , वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक लोणावळा मध्य रेल्वे , यांना दिले आहेत. यावेळी त्यांच्या समवेत अनेक आर पी आय महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.





