…..” स्वच्छता – सुरक्षितता – समाधान हाच कर्जत तालुका टुर्स अँड ट्रॅव्हल्स चा मूलमंत्र , ओला उबेर ला आमचा विरोधच – नदीम भाई खान “……
स्थानिक " भूमिपुत्रांना " प्राधान्य द्या , असे विनम्र आवाहन !

स्थानिक ” वाहन चालक – टॅक्सी व रिक्षा ” धारकांचा हा गंभीर प्रश्न आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या दरबारी…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यात ” डी मार्ट ” आले आणि सर्व किरकोळ किराणा दुकान व्यापारी देशोधडीस लागले , याचे जिवंत उदाहरण कर्जत शहरासहित कर्जत तालुक्यातील इतर प्रमुख शहरात तसे चित्र दिसत असताना ” ओला उबेर ” सारख्या बाहेरून येणाऱ्या टूर्स ट्रॅव्हल्स गाड्यांना आम्ही सहन करून आमचे कुटुंब देशोधडीस लावणार नाही , आम्ही तुमचीच स्थानिक भूमिपुत्र असताना आमचा व आमच्या कुटुंबाचा देखील विचार व्हावा , असा भावनिक सवाल ” कर्जत टुर्स अँड ट्रॅव्हल्स वाहन संघटनेचे अध्यक्ष नदीम भाई खान ” यांनी उपस्थित करत , येथे यापूर्वी देखील सुरू नसलेल्या ओला उबेर सारख्या बाहेरच्या ट्रॅव्हल्स कंपनीचा विचार न करता आमचा विचार व्हावा , असे स्पष्ट मत नदीम भाई खान यांनी व्यक्त केले आहे.

ओला उबेर यांची वाहने इतर ठिकाणाहून कर्जतमध्ये प्रवासी सोडू शकतात पण येथून प्रवासी घेऊन जाऊ शकत नाहीत , असे अनेक वर्षांपासून आमच्या संघटनेने ठरवलेले असून आम्ही जास्त पैसे घेतो , हा आरोप देखील अध्यक्ष नदीम भाई खान यांनी खोडून काढत , ओला उबेर हे १८०० रुपयांत मुंबईहून इकडे सोडतात , हे फक्त एका बाजूचे पैसे आहेत , म्हणजेच नेण्याचे आणि पुन्हा सोडायचे ३६०० रु. झाले , ते आम्ही कर्जत – मुंबई व मुंबई ते कर्जत असे दोन्ही बाजूचे मिळून फक्त ३ हजार घेतो , त्यात स्वच्छ गाडी , सुरक्षित प्रवास , व प्रवाशांचे समाधान हे फक्त स्थानिक वाहन धारक च देऊ शकतात , ओला उबेर चे वाहन चालक कोण आहेत ? ते सुरक्षितता देऊ शकतात का ? गाडी कुठेही घेऊन जाऊ शकत नाहीत , मात्र आमची सेवा हि समाधान देणारी असल्याचे मत टुर्स अँड ट्रॅव्हल्स चे अध्यक्ष नदीम भाई खान यांनी व्यक्त केले आहे.
कर्जत तालुक्यातील पर्यटन व्यवसाय हा अनाधि काळापासून सुरू आहे , इकडे येणारे पर्यटक हे स्वतःचे वाहन घेऊन येत असतात , त्यामुळे फॉर्म हाऊस धारकांनी ” असंतोष ” निर्माण होतील असे ” गढूळ प्रश्न ” उपस्थित करू नये , व ” रान पेटवू ” नये , अशी विनंती देखील ” नदीम भाई खान ” यांनी याप्रसंगी केली.
कर्जत – नेरळ – माथेरान – खोपोली – लोणावळा – अलिबाग यांसारख्या पर्यटन स्थळी देखील ओला उबेर या वाहन धारकांना बंदी आहे. राज्यात तसेच देशात देखील बाहेरच्या वाहन धारकांना असे धंदे करून देत नाहीत , तर आम्ही देखील का करून देऊ ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या अगोदर देखील येथे ओला उबेर सेवा सुरू नव्हती , यासाठी अनेक पक्षाने , संघटनेने विरोध केला असताना ग्रीन झोन असलेल्या कर्जत तालुक्यात इंडस्ट्रीज नसल्याने १०० ते १५० छोट्या वाहन धारकांचे अनेक बदली वाहन चालकांचे उदार निर्वाह अनेक वर्षे यावरच सुरू असल्याने चार चाकी डिझेल गाड्यांचे , टॅक्सी , यांचे बँक कर्ज , कुटुंबाचे पालन पोषण , मुलांचे शिक्षण , आरोग्य हे सर्व या टुर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायावरच अवलंबून असल्याने या सर्व बाबींचा विचार करून कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांनी देखील झालेल्या बैठकीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देत ओला उबेर सेवा येण्यास ” मज्जाव ” करत ” विरोध ” केला आहे.
कर्जत सारख्या ग्रामीण भागात बाहेरच्या ओला उबेर वाहन सारख्या सेवांना म्हणूनच बंदी असून स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या कुटुंबाला प्राधान्य देऊन कृपया हे रान उगीचच पेटवू नका , अशी विनंती कर्जत टुर्स अँड ट्रॅव्हल्स वाहन संघटनेचे अध्यक्ष नदीम भाई खान यांनी सध्या होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी केली आहे.




