दिल्ली NCR

……” जागतिक आदिवासी दिनानिमित्त कशेळे येथे भव्य मिरवणूक सोहळा संपन्न “…..

आमदार " महेंद्र शेठ थोरवे " यांची प्रमुख उपस्थिती !

कशेळे येथे उभा राहत असलेल्या ” आदिवासी भवन ” चे पुढील वर्षीच्या ” जागतिक आदिवासी दिनाला ” लोकार्पण करू – आमदार महेंद्र शेठ थोरवे……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

०९ ऑगस्ट ” जागतिक आदिवासी दिनाच्या ” निमित्ताने कशेळे येथे आदिवासी बांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांनी सहभागी होत आनंदोत्सव साजरा केला. संस्कृती, परंपरा आणि निसर्गरक्षणाचा वसा जपत, जल – जंगल – आणि जमीन यांचे रक्षण करण्याची गौरवशाली परंपरा असलेल्या आदिवासी बांधवांच्या देशासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करत वीर पुरुषांना अभिवादन याप्रसंगी करण्यात आले.

          या अनोख्या आणि अभूतपूर्व मिरवणूक सोहळ्यात आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी उपस्थितांशी संवाद देखील साधला. समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न करत असतानाच आदिवासी समाजाची अस्मिता जपण्यासाठी गेल्या वर्षी याच दिवशी भूमिपूजन होऊन कशेळे येथे भव्य ” आदिवासी भवन ” उभा राहत आहे. पुढील वर्षी जागतिक आदिवासी दिनाला या भव्य वास्तूचे लोकार्पण करण्याची घोषणा त्यांनी याप्रसंगी केली.

          या मिरवणूक सोहळ्यात सर्व आदिवासी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, आदिवासी बंधू-भगिनी व स्थानिक नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. तर याप्रसंगी आमदार महेंद्र शेठ थोरवे , युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे , युवा तालुका प्रमुख अमर मिसाळ , भास्कर दिसले  व इतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!