दिल्ली NCR

……” दिल्ली येथील आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जमुळे २३ जुलै रोजी कर्जत बंद “……

वंचित बहुजन आघाडीचे नेते " ॲड. बाळासाहेब आंबेडकर " यांनी महाराष्ट्र बंद ची दिली हाक !

बंदच्या पार्श्वभूमीवर ” पोलीस प्रशासन, व्यापारी फेडरेशन , रिक्षा संघटना व नागरिकांनी ” सहकार्य करावे – जिल्हा महासचिव धर्मेंद्र दादा मोरे 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी दिल्ली येथील जन प्रक्षोभात होत असलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या ” अमानुष लाठीचार्जमुळे ” संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण असून याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन पेटले असताना गुरुवार दिनांक २३ जुलै २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते ” ॲड. बाळासाहेब आंबेडकर ” यांनी ” महाराष्ट्र बंद ” ची हाक दिली आहे . या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, व्यापारी फेडरेशन , सामाजिक संघटना , प्रवासी रिक्षा संघटना तसेच कर्जतकर नागरिकांनी कर्जत तालुका बंद ठेवून सहकार्य करावे , अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव ” धर्मेंद्र दादा मोरे ” यांनी सर्वांना केली आहे . याबाबतचे निवेदन त्यांनी सर्वांना दिले आहे .

          निट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान दि. २० जुलै रोजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज व अत्याचाराचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दि. २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

        या अनुषंगाने कर्जत तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने समाजहित व विद्यार्थ्यांप्रती ऐक्य व्यक्त करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत असून हा बंद पूर्णपणे शांततापूर्ण, संविधानिक व लोकशाही मार्गाने पाळण्यात येणार आहे. सर्व नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, रिक्षा संघटना ,सामाजिक संघटना व जनतेने स्वयंस्फूर्तीने सहकार्य करून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धर्मेंद्र दादा मोरे, तालुका अध्यक्ष प्रदीप ढोले, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल आप्पा गायकवाड, शहर अध्यक्ष लोकेश यादव व इतर पदाधिकारी यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!