……..” विकास कार्याचे उत्तुंग शिखर – बहुजनांचे ” कर्तबगार नेतृत्व ” , मा. उपनगराध्यक्ष ” उमेश आप्पा गायकवाड “……..
दिलदार मनाचा....दिलदार राजा.....!

सामाजिक कार्याने गुंडगे येथे होणार ” वाढदिवस ” साजरा…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
” एक छोटीशी मदत ” समोरच्या प्रसंगात अडकलेल्या व्यक्तीसाठी ” लाख मोलाची ” असते , हे आपल्या जीवनात घेतलेल्या अनुभवावरून जाणले असल्याने कधीही – कुणालाही मदत करण्यास अग्रेसर असलेले कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागाचे मा. उप नगराध्यक्ष ” उमेश आप्पा गायकवाड ” सर्वांसाठी धावून जातात . सामाजिक जाणीवतेचे भान ठेवून आपणही या समाजाचे काही देणे आहोत , या उद्दात हेतूने प्रेरित होऊन ते नेहमीच सामाजिक – धार्मिक – शैक्षणिक – आरोग्य – कला क्रीडा – शासकीय कामे – पोलीस स्टेशन – कोर्ट कचेरी या माध्यमातून त्यांची सतत मदत सुरू असते . कर्जत तालुक्यातील बहुजन समाजातील ते ” उभरते नेतृत्व ” असून कर्जत नगर परिषदेवर ते २ वेळा निवडून येवून प्रतिनिधित्व केले तर आताच्या निवडणुकीत त्यांची पत्नी ” सौ. हर्षाली गायकवाड ” या निवडून आल्याने व परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्षा सौ पुष्पाताई दगडे व संपूर्ण गुंडगे प्रभागातील पॅनल निवडून आणण्यात उमेश आप्पा गायकवाड यांचा खारीचा वाटा आहे , म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा त्यांनी गुंडगे प्रभागात डौलाने फडकत ठेवला आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत नगर परिषद प्रभाग क्रमांक १० गुंडगे प्रभागाचे मा. उप नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष ” उमेश आप्पा श्रीरंग गायकवाड ” हे सातत्याने महिला सबळीकरण करण्यासाठी व्यवसाय , प्रशिक्षण शिबिर आयोजित करत असतात . महिलांनी चूल आणि मूल यांच्या बंधनात न रहाता व्यवसायात उतरून स्वताच्या पायावर उभे रहाणे गरजेचे आहे , असे त्यांचे म्हणणे असते . प्रत्येक वर्षी नागरिकांच्या व विद्यार्थी, महिलावर्ग यांच्या हिताचे व महत्वाचे उपक्रम राबविणे , वृक्षारोपण व संवर्धन करणे हे जणू लोकप्रिय मा. नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड यांचे जीवनाचे माध्यम झाले आहे .
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून अतिशय नम्र स्वभावाचे , सर्वांचा आदर ठेवणारे उमेश आप्पा गायकवाड सर्वांच्याच मनात घर करून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे , त्यांचे करिअर व्हावे , महिलांचे आर्थिक सबळीकरण व्हावे , यासाठी तसेच निसर्गाचा समतोल राखावा म्हणून वृक्षारोपण , विद्यार्थांचे शासकीय दाखले शिबीर , रक्तदान शिबिर , आरोग्य शिबीर घेऊन देशव्यापी व उल्लेखनीय कार्य करतात तर या क्षेत्रात काम करणाऱ्या विभुतींना सन्मानित करून त्यांना प्रोत्साहित करत असतात . कोरोना काळात देखील त्यांनी आपल्या परिसरातील अनेक नागरिकांना अन्न – धान्य , कौटुंबिक वस्तू , चादरी , लसीकरण शिबिर व ईतर सामुग्री सढळ हाताने मदत देऊन खूप मोठे कार्य केले .
आपल्या परिसरातून देखील mpsc व upsc पास होवून आयपीएस – आयएएस अधिकारी व्हावे , असे त्यांचे स्वप्न असल्याने ते दरवर्षी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करतात . या सर्व क्षेत्रात काम करताना मा. नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड यांना त्यांच्या मित्र मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभते , तर आई मुक्ताई व वडील बंधू रमेश दादा , सुरेश भाई , यांची साथ दिवंगत वडील श्रीरंग व गणेश दादांचे आशीर्वाद नेहमीच असतात , त्याचप्रमाणे नेहमीच सावली सारखी प्रत्येक कार्यात सहभागी असणारी त्यांची पत्नी , नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण सभापती सौ. ” हर्षाली ” व कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळेच माझ्या हातून ही समाजसेवा होत असून मी इथवर पोहचलो , असे मत लोकप्रिय मा. उप नगराध्यक्ष तथा कर्जत तालुका भीम जयंती उत्सवाचे माजी अध्यक्ष ” उमेश आप्पा गायकवाड ” हे नेहमीच बोलत असतात .
म्हणूनच आज बुधवार दिनांक १ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुंडगे प्रभागात सकाळी ” वृक्षारोपण व बसण्यास बाकडे ” वाटप कार्यक्रम तर संध्याकाळी ५.०० वाजता १) छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज चौक – गुंडगे येथे सीसीटीव्ही कॅमेरा चे लोकार्पण २ ) गुंडगे समाज मंदिराचे उद्घाटन सोहळा कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा ” सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे ” यांच्या हस्ते , व कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” व ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ” नितीन दादा सावंत ” यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असून समाज मंदिर गुंडगे येथेच त्यांचा जन्म दिवस ” अभिष्टचिंतन सोहळा ” होणार आहे . तरी या भव्य आणि दिव्य कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे , असे निमंत्रण गुंडगे प्रभागाचे मा. उपनगराध्यक्ष उमेश आप्पा गायकवाड मित्र मंडळ परिवार यांनी केले आहे .




