Uncategorizedदिल्ली NCR

…..” टोरंटो धरण प्रकल्प रद्द करा , कर्जत – खालापूर ठाकरे शिवसेना महिला आघाडीचा एल्गार “……

अनेक " रणरागिणींची " कर्जत तहसील कार्यालयाला धडक !

उत्तराखंडमध्ये महिलांनी उभारलेल्या ” चिपको आंदोलनासारखे ” मोठे आंदोलन उभे करणार – सौ प्रमिला सुरेश बोराडे 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यातील भूमिपुत्रांबरोबरच शेतकरी , आदिवासी , कष्टकरी नागरिकांचे जनजीवन ” उध्वस्त ” करणारा तर वन वनस्पती , जीव , प्राण्यांना बेघर करून मरणाच्या खाईत टाकणारा ” टोरंटो धरण प्रकल्प ” रद्द करा , असा एल्गार आज ” शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ” पक्षाच्या कर्जत खालापूर मतदार संघातील रणरागिणी , कर्जत तालुका महिला संघटिका सौ. करुणा प्रकाश बडेकर यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तहसील कार्यालयावर धडकल्या . हा जुलमी टोरंटो धरण प्रकल्प रद्द करा – रद्द करा , अश्या घोषणा देत शासनाला जागे करण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडी तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा संतप्त इशारा यावेळी देण्यात आला .

           कर्जत तालुक्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या ” टोरेंटो वीज प्रकल्पा ” बाबत सर्व नागरिक चिंतेत आहेत. यामुळे ” नैसर्गिक वनसंपदा जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल ” धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. मुक्या जीवांनी कोणाकडे न्याय मागावा ? अशी भावनिक परिस्थिती निर्माण झाली आहे . या प्रकल्पामुळे अनेक शेतकरी, आदिवासी, कष्टकरी आणि स्थानिक कुटुंबाचे विस्थापन होऊन अनेकांची घरे , शेती , व्यवसाय , उपजीविकेची साधने , नष्ट होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. तर या वीज प्रकल्पाचे उभे करण्यात येणारे ” टॉवर ” मुळे अनेक शेती बाधित होणार आहेत . शासन – प्रशासनाने जनतेचे पालक बनून राजकीय दृष्टीने, किंवा मूठभर लोकांच्या हितासाठी या प्रकल्पांचा विचार न करता पितृ हृदयाने जनतेच्या हितासाठी प्रयत्न केले पाहिजेत , अशी विनंती ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीने तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदनाद्वारे केली .   

           जीवसृष्टीला हानी पोहोचविणारे विनाशकारी प्रकल्प राबवून तालुक्यातील पर्यावरण आणि मानव जातीला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असाल , तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू , म्हणूनच महाविनाशकारी टोरंटो वीज प्रकल्प रद्द करण्यात यावा व प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड ताबडतोब थांबवण्यात यावी , अन्यथा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उत्तराखंडमध्ये महिलांनी उभारलेल्या ” चिपको आंदोलनासारखे ” मोठ्या प्रमाणात संतप्त तीव्र आंदोलन उभे करू , व याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल , असा क्रोध ईशारा ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कर्जत तहसीलदार धनंजय जाधव व कर्जत उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांना निवेदनाद्वारे देण्यात आला .

         यावेळी निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कर्जत तालुकाप्रमुख सौ. करुणा बडेकर , हालिवली मा. सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे , जिल्हापरीषद सदस्य सुनिता मोरे , पंचायत समिती सदस्य नमिता श्रीखंडे , उपतालुका प्रमुख संगीता खडे , युवती सेना प्रमुख अर्चना म्हसे, कर्जत शहर प्रमुख योगिता डागा , सौ. मिरकुटे – महिला विभाग संघटक कळब , त्याचप्रमाणे अनेक महिला रणरागिणी याप्रसंगी उपस्थित होत्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!