Uncategorizedदिल्ली NCR

…..” आठ वर्षे रखडलेल्या रस्त्यावर डांबरीकरण तरी करा , भिसेगाव रहिवाश्यांची संतप्त मागणी “……

कर्जत नगर परिषद व सत्ताधारी परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्षा सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे यांचे दुर्लक्ष !

पावसाळ्यात ” चिखल व पाण्यातून ” या रस्त्यावरून चालणे हि होणार मुश्किल…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव प्रभागातील स्टँडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूला ” औदुंबर ” इमारतीकडे जाणारा अंतर्गत रस्ता फारच ” दुर्धर ” झाला आहे . रस्त्याच्या लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत . दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणे मुश्किल होत असताना चिखलातून व पाण्यातून मार्ग काढावा लागतो , दर वेळी ” आश्वासनाची खैरात ” करणाऱ्या नगर परिषदेच्या व सत्ताधाऱ्यांच्या या ” ढोंगी ” कारभाराचा या परिसरातून संतप्त भावना उमटत आहेत , विशेष म्हणजे गेल्यावेळी याच प्रभागातून आताच्या नगराध्यक्षा ” सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे ” या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या . मात्र अजूनही या प्रभागातील रस्त्याचे काम झाले नसल्याने ” कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्षा सौ पुष्पा दगडे ” यांच्याविरोधात या परिसरात संतप्त वातावरण आहे .

        या दुर्लक्षित झालेल्या रस्त्याचे भूमिपूजन सन २०१८ साली राष्ट्रवादीची सत्ता असताना झाले होते , मात्र नंतर कर्जत नगर परिषदेवर सत्ता बदलून शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला , व आता पुन्हा राष्ट्रवादी व ठाकरे शिवसेनेनी उदयास घातलेल्या परिवर्तन विकास आघाडीची सत्ता कर्जत नगर परिषदेवर आली आहे . या रस्त्याच्या कामाचे जुने टेंडर रद्द करण्यात आले असल्याचे समजते , मात्र ते कसे , कुणी व का रद्द केले गेले ? याची कल्पना कुणालाच नाही .

           मध्यंतरी काळात ” नगराध्यक्षा तुमच्या दारी ” , हा समस्या निवारण करण्याचा भिसेगाव दौरा नगराध्यक्षा सौ पुष्पा दगडे यांनी केला असता या रस्त्याची तक्रार व रस्ता सुधारण्याबद्दल त्यांना सांगितले होते , मात्र पाहणी करूनही पाऊस पडण्याची वेळ आली तरी कर्जत नगर परिषद व परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्षा सौ पुष्पा दगडे यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत असून हा रस्ता कधी करणार ? निदान डांबरीकरण तरी करा , असा संतप्त सवाल व मागणी आता येथील नागरिक करीत आहेत .

          उद्यम नगर येथील अंतर्गत रस्त्यावर स्वतःच्या परिसरात डांबरीकरण करणाऱ्या ” नगराध्यक्षा ” भिसेगावच्या या रस्त्याला न्याय देणार का ? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!